संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
नगर ः विवाहसमारंभ, अंत्यविधी, दशक्रियाविधी, रुग्णालय वाहनतळ या ठिकाणीहून दुचाकी चोरी करणा-या टोळीचा कोतवाली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत 29 दुचाकी मिळून आलल्या असून, असा एकूण 15 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
एसपी राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, नगर शहर डिवायएसपी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोतलावीचे पोनिप्रताप दराडे यांनी दिलेल्या सूचनेनुसार पोसई महेश शिंदे, पोसई प्रविण पाटील, गुन्हे शोध पथकाचे पोहेकॉ योगेश भिंगारदिवे, विशाल दळवी, गणेश धोत्रे, विक्रम वाघमारे, सुर्यकांत डाके, सलीम शेख, पोना अविनाश वाकचौरे, पोकॉ अभय कदम, अमोल गाढे, सतिश शिंदे, अतुल काजळे, राम हंडाळ, वर्षा पंडीत, सफौ अशोक सरोदे, लक्ष्मण बोडखे, अनुप झाडबुके, मपोकॉ पल्लवी रोहकले, पूजा दिक्कत, दक्षिण मोबाईल सेलचे पोकॉ राहुल गुंडू आदिंच्या टिमने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, नगर शहरात दिवसेंदिवस दुचाकी चोरीच्या घटनांची मोठे प्रमाण वाढल्याने शहरातील दुचाकी नक्की कोण चोरी करत आहे? व त्या गाड्या जातात तरी कुठे? याबाबत माहिती काढण्याकरिता कोतवाली पोलीस ठाण्याचे पोनि प्रताप दराडे यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार एक टिम तयार केली. यानंतर तांत्रिक विश्लेषणावरून माहिती काढली. या दरम्यान, किशोर जयसिंग पटारे (रा.पिंपळगार माळवी ता.नगर) हा नगर शहर व जिल्हा तसेच पुणे, बीड परिसरातील दुचाकी विवाहसमारंभ, अंत्यविधी, दशक्रियाविधी या ठिकाणांवरुन दुचाकी चोरी करुन त्याची विल्हेवाट लावणे करीता त्याचे साथिदार बाबासाहेब ज्ञानदेव खाडे (वय 42, रा.लाखपढेगाव ता.राहुरी जि. अ.नगर), अरुण सुधाकर जाधव (रा.टाकळीमियॉ, ता.राहुरी जि. अ.नगर) यांच्या मदतीने ओळखीच्या लोकांना गाडीचे पेपर आणून देतो व तोपर्यंत तुम्ही गाडी वापरा, त्या बदल्यात मला आत्ता 2 ते 3 हजार रुपये द्या. यानंतर गाडी तुमच्या नावावर केल्यानंतर उर्वरीत पैसे द्या, असे सांगून जवळपासच्या लोकांना चोरीच्या दुचाकी गाड्या वापरण्यास देत असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे नियुक्त टिमने शोध मोहीम हाती घेतली. या मोहिमेत आरोपी किशोर जयसिंग पटारे हा फरार झाला. त्याचे साथीदार बाबासाहेब ज्ञानदेव खाडे, अरुण सुधाकर जाधव या दोघांना कोतवाली पोलीसांनी ताब्यात घेतल्याची माहीती पटारे याला मिळाली. यामुळे मुख्य आरोपी किशोर पटारे याने चोरी केलेल्या, त्याच्या ओळखीच्या लोकांना वापरायला दिलेल्या गाड्या परत घेऊन त्या त्यांच्या नेहमीच्या ठरलेल्या ठिकाणी बेवारस सोडलेल्या आहेत, अशी माहीती ताब्यात घेतलेल्या दोन आरोपीकडून प्राप्त झाली. त्यानुसार त्यांनी दाखवलेल्या ठिकाणावरुन एकूण 15 लाख रुपये किंमतीच्या 29 दुचाकी विविध ठिकाणावरुन हस्तगत करण्यात आल्या आहेत. जप्त केलेल्या दुचाकी या आरोपींनी बीड, पुणे, अहमदनगर जिल्ह्यातील चोरी गेलेल्या आहेत. त्या चोरीच्या दुचाकीचे चेसी व इंजिन क्रमांक पाहून खात्री करावी, तसेच दुचाकीचे कागदपत्रे देऊन योग्य ती कार्यवाही पूर्ण करून त्या घेऊन जाव्यात, असे आवाहन कोतवालीचे पोनि प्रताप दराडे यांनी केले आहे.