संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर – दिल्लीगेट इंटरनल व्यापारी असोसिएशन “दिवा ग्रुप ” चा सहावा वर्धापन दिन सोहळा आणि जागतिक महिला दिनाचे हॉटेल श्रध्दा येथे आयोजन करण्यात आले होते . दिल्लीगेट व्यापारी असोसिएशन चे संस्थापक राजेंद्र येंडे पाटील यांच्या पुढाकारातुन मार्च २०१७ मध्ये असोसिएशन ची स्थापना करण्यात आली. या व्यापारी असोसिएशन चे “दिवा ग्रुप ” असे नामकरण करण्यात आले.
दिवा ग्रुप चे अनिल गांधी, नंदेश शिंदे आणि विशाल येंडे यांनी या वर्षी हॉटेल श्रध्दा येथे वर्धापन दिन सोहळा आयोजित केला होता. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने दिवा ग्रुप मधिल सर्व सदस्यांच्या पत्नींना या सोहळ्यासाठी विशेष निमंत्रण देण्यात आले होते.उपस्थित सर्व मान्यवरांचे विशाल येंडे यांनी स्वागत करुन कार्यक्रमाचे स्वरुप सांगितले.
प्रास्ताविक असोसिएशन चे संस्थापक राजेंद्र येंडे पाटील यांनी केले. गेली सहा वर्षे सलग दिल्लीगेट असोसिएशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. अनाम प्रेम मधिल विद्यार्थ्यांना दर वर्षी दिपावली फराळ देऊन त्यांची दिपावली गोड करण्यात येते तसेच हेल्पिंग हॅन्ड फॉर हंगर्स या संस्थेस धान्य देऊन छोटी मदत,असोसिएशन मधील सभासदांच्या दहावी- बारावी गुणवंत पाल्यांचा सत्कार, प्रत्येक सभासदांचा वाढदिवस कार्यक्रम, प्रत्येक वर्षी दिपावली , महिला दिन या निमित्ताने महिलांना भेटवस्तु देऊन यथोचित सन्मान, कोविड काळात कर्तव्यावरील पोलीस बांधवांसाठी पिण्याचे पाणी वाटप,गोशाळेसाठी चारा, असे विविध सामाजिक उपक्रम गेल्या सहा वर्षांत राबवले असल्याचे असोसिएशन चे संस्थापक राजेंद्र येंडे पाटील यांनी सांगितले.
या संपुर्ण कार्यकमांचे सूत्रसंचालन करुन कार्यक्रमाची रंगत वाढवण्याची जबाबदारी नंदेश शिंदे यांनी अत्यंत हुशारीने सांभाळली. या वेळी उपस्थित सर्व मान्यवर महिलांचा फेटा बांधून, भेटवस्तु देवुन सत्कार करण्यात आला.
या वेळी दिवा ग्रुप चे जेष्ठ सदस्य चंद्रशेखर भालेराव यांच्या पत्नी जयश्री भालेराव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना दिवा ग्रुप च्या माध्यमातून प्रत्येक वर्षी राबवत असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या, तसेच आदर्श शिक्षिका मनिषा शिंदे आणि चित्रा येंडे यांनी दिवा ग्रुप च्या माध्यमातून उपस्थित सर्व महिलांना एकत्र राहण्यासाठी विविध उपक्रमांची माहिती दिली ,याच व्यासपीठावर सर्व महिलांची एकजूट केली, या वेळी मनिषा शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दिपक दासवानी, संदीप गवळी, सागर लबडे, सुंदरलाल भागवत यांनी परिश्रम घेतले. या समारंभासाठी सर्व सभासद सपत्निक उपस्थित होते यामध्ये अनिल गांधी, नीता गांधी, प्रविण गुंडु , विद्या गुंडु, दिलीप खोजे, माधुरी खोजे,दिलीप सुपेकर, प्रमिला सुपेकर, अजिंक्य सुपेकर, अंबादास कांबळे, सुनंदा कांबळे, प्रशांत पवार, अर्चना पवार, दिपक दासवानी, हर्षिता दासवानी, लविना दासवानी, सचिन पावले,कल्याणी पावले, सागर लबडे, डॉक्टर गायत्री लबडे, स्वानंदी लबडे, सोमनाथ भगुरे, पद्मीनी भगुरे, बापु सांगळे, स्नेहल सांगळे, चंद्रशेखर भालेराव, जयश्री भालेराव, विशाल येंडे, दिक्षा येंडे, संजय सावज, ज्योती सावज, संदिप गवळी, अर्चना गवळी, नंदेश शिंदे, मनिषा शिंदे, राजेंद्र येंडे, चित्रा येंडे यांनी वर्धापन दिन सोहळ्याची शोभा वाढवली. स्नेह भोजना नंतर कार्यक्रमाच्या शेवटी अनिल गांधी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना उपस्थित मान्यवरांचे मनःपूर्वक आभार मानले.