तोफखाना पोलीस ठाणे : २ आमदारांच्या नावाने बनावट शिक्के, दोघांना अटक

तोफखाना पोलीस ठाणे : आमदारांच्या नावाने बनावट शिक्के, दोघांना अटक
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
Nagar Reporter
अहमदनगर, :
आमदार संग्राम जगताप, आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या जिल्हा शासकीय रूग्णालय, महापालिकेच्या शाळेच्या नावाने बनावट शिक्के तयार करून आधारकार्ड दुरूस्ती करणाऱ्या टोळीचा गोरखधंदा तोफखाना पोलिसांनी उघडकीस आणला आहे. याप्रकरणी हारूण हबीब शेख (वय ३१, रा. वरवंडी, ता. राहुरी), दादा गोवर्धन काळे (वय ३५, रा. निंबोडी, ता. नगर) असे दोघांना अटक केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, सावेडीतील भारत संचार निगम लिमिटेड (बी.एस.एन.एल.) ऑफिसनजिक एका गाळ्यामध्ये सक्सेस मल्टीसर्व्हिससे आधार कार्ड दुरूस्तीचे केंद्र आहे. या ठिकाणी बनावट कागदपत्र तयार केले जात आहेत, अशी माहिती तोफखाना पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांना मिळाली होती. त्यांनी गुन्हे शोध पथकाचे सपोनि समाधान सोळंके, सनि जे.सी. मुजावर यांना टिमसह छापा टाकण्याचे आदेश दिले. त्यानुसार या ‘तोफखाना टिम’ने सोमवारी (ता.१७) दुपारी आधार दुरूस्ती केंद्रावर छापा टाकला. पंचासमक्ष घेतलेल्या झडतीमध्ये या केंद्रात आमदार संग्राम जगताप, आमदार प्राजक्त तनपुरे, मुख्याध्यापिका, महानगरपालिका शाळा क्रमांक २३, तोफखाना, अहमदनगर आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा शासकीय रूग्णालय, अहमदनगर या नावा चे चार शिक्के आढळून आले. या केंद्रातील हारूण शेख, दादा काळे आणि वीरकर ही महिला असे तिघे कार्यरत होते. नागरिकांना आधार दुरूस्तीसाठी शासकीय पुरावा नसल्यास आमदारांच्या शिक्क्यांचा वापर करून रहिवाशी दाखला देणे, वयाच्या दाखल्यासाठी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा शासकीय रूग्णालय यांच्या शिक्क्याचा वापर केला जात होता. या केंद्रातील सर्व कागदपत्रे पोलिसांनी जप्त केले आहेत. पोलिस अंमलदार दत्तात्रय जपे, सुरज वाबळे, कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

तोफखाना पोलीस ठाणे: महिला डॉक्टरची लाखांची फसवणूक
Nagar Reporter
अहमदनगर
: शहरातील एका खासगी रूग्णालयात मानसोपचार तज्ञ्ज म्हणून कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरच्या बँक खात्यातून ९९ हजार ५०० रूपये काढून घेत त्यांची ऑनलाईन फसवणूक झाली. त्यांच्या मोबाईलवर आलेल्या लिंकवर त्यांनी माहिती भरल्यानंतर बँक खात्यातून पैसे काढून घेण्यात आले आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी पाच वेगवेगळ्या मोबाईल नंबरधारकांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
महिला डॉक्टरने अंगठीमध्ये घालण्यासाठी पुष्कराज खडा ऑनलाईन ऑर्डर केला होता. सदर ऑर्डर घेण्यासाठी त्यांनी नोकरीला असलेल्या खासगी रूग्णालयाचा पत्ता दिला होता. त्यानंतर एका व्यक्तीने त्यांच्या मोबाईलवर फोन करून ऑर्डर केलेल्या पार्सलचा पत्ता बदलायचा आहे का? अशी विचारणा केली. त्यांनी प्रतिसाद दिल्यानंतर त्यांच्या मोबाईलवरील व्हॉट्सअपवर एक लिंक पाठवली. त्यांनी सदर लिंक ओपन करून समोरच्या व्यक्तीला ओ.टी.पी दिला. त्यानंतर फिर्यादीच्या बँक खात्यातून ९९ हजार ५०० रूपये काढून घेण्यात आले. दि.९ एप्रिल ते दि.१३ एप्रिल २०२३ दरम्यान ही घटना घडली आहे. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिस अधीक्षक यांच्याकडे अर्ज दाखल केला. सदरचा अर्जाची चौकशीसाठी तोफखाना पोलिस ठाण्यात पाठविण्यात आला. या अर्जाच्या प्राथमिक चौकशीमध्ये फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर वेगवेगळ्या पाच मोबाईल नंबरधारकाविरोधात फसवणूक तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक मधुकर साळवे पुढील तपास करीत आहेत.

तोफखाना पोलीस ठाणे : रात्री उशिरापर्यंत दुकाने ठेवणाऱ्या ३६ दुकानांवर कारवाई
Nagar Reporter
अहमदनगर :
रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या दुकानांवर तोफखाना पोलिसांनी सलग दुसऱ्या दिवशी रविवारी (ता.१६) ही कारवाई केली. सावेडीतील ३६ दुकानांवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (डब्लू) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
उपसरपंच चहा दातरंगे मळा, पंजाबी तडका तारकपूर, हॉटेल सागर दिल्लीगेट, दिनशा आईस्क्रिम तारकपूर, सम्राट हॉटेल, भाई पान रामवाडी, बेलजिअम व्होफल झोपडी कॅन्टींग, हनुमान पान शॉप दिल्ली गेट, सुपर किराणा दुकान मिस्कीन रोड, नॅचरल कुल्फी दिल्लीगेट, स्वाद मराठी हॉटेल, हॉटेल कुरेशी कोठला, रोशन कलेशन कोठला, बापू पान दुकान कोठला, मातोश्री चायनीज बालिकाश्रम रोड, सरकार पान टपरी कोठला, राजवीर हॉटेल, तारा पान प्रेमदान चौक, विशाल सोडा तारकपूर, हॉटेल रॉयल, रॉयल आईस्क्रिम कुष्ठधामरोड, हॉटेल समृध्दी गुलमोहर रोड, हिरामोती पान दुकान प्रेमदान चौक, म्हस्का कुल्फी प्रेमदान चौक, नक्षत्र पान दुकान सोनानगर चौक, तारंगण पान शॉप पाईपलाईन रोड, हातगाडी शाही कोठला, बिर्यानी दरबार गुलमोहर रोड, चायनिज फेंन्ड गुलमोहर रोड, बाबा स्नॅन्स तारकपूर, चायमस्का प्रेमदान चौक, मनिष किराणा दुकान पाईपलाईन रोड, वैष्णवी तारकपूर, एस.टी. जनरल स्टोअर तारकपूर, एस.टी.डी. कॅन्टींग तारकपूर यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!