संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत डी.जे.चा कर्कश्श करणा-या ९ मंडळांच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ध्वनी पातळी जास्त असल्याने ९ मंडळांच्या अध्यक्ष आणि डी.जे. चालक-मालकांवर तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तोफखाना पोलिस ठाण्याचे गोपनीय शाखेचे कर्मचारी तन्वीर शेख हे पोलिस पथकासह मिरवणूक मार्गावर गस्त घालत होते. त्यावेळेस सरकारी पंचासमक्ष ध्वनी पातळी मोजण्यात आली. तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये चितळे रस्तासह विविध ठिकाणी सरकारी पंच बाबासाहेब बापूराव टेकाळे (वय ५७, नियुक्ती- सार्वजनिक बांधकाम विभाग) आणि जालिंदर अशोक तोडमल (वय ३६, नियुक्ती- सार्वजनिक बांधकाम विभाग) याच्यासमक्ष शुक्रवारी (ता.१४) रात्री आठ ते दहा वाजण्याच्या दरम्यान ध्वनी मर्यादा मोजण्यात आली. ध्वनी पातळी जास्त असलेल्या नऊ मंडळाचे अध्यक्ष आणि डी.जे. चालक-मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. स्वप्निल बाळासाहेब पोपळघट, डी.जे. चालक सुरज शिवा खोत (रा. कागल, जि. कोल्हापूर), जयंत छगन भिंगारदिवे (नगर), मयूर विजय खैरे (पुणे), गणेश पांडुरंग गायकवाड (सिद्धार्थनगर), ओंकार गाडेकर (शिक्रापूर), किरण दाभाडे (सिद्धार्थनगर), दादू सुरेश दौंडकर (नारायणगाव), सुमेध गायकवाड (सिद्धार्थनगर), प्रविण भालसिंग (वाळकी), शुभम राजू पाडळे, अनिल आढाव (डोंगरगण),नितीन पाडळे (कौलारू झोपडपट्टी), नईम शेख (निवडुंगे), विशाल गायकवाड (कौलारूझोपडपट्टी), हर्षद ढगे, कश्यप प्रकाश साळवे,भूषण रामदास शेटे (निमगाव पागा) यांच्यावर पर्यावरण संरक्षण अधिनियम, ध्वनी प्रदूषण नियंत्रण अधिनियम २०००, महाराष्ट्र पोलिस अधिनियम आणि भारतीय दंड संहितेमधील कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिरवणुकीच्या वादातून युवकावर हल्ला
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीमध्ये मिरवणुकीत नाचण्यावरून दोन तरूणांमध्ये वाद झाला. या वादातून तरूणावर धारदार हत्याराने वार करण्यात आले. कापड बाजारातील कोहिनूर क्लॉथ स्टोअर ते इमारत कंपनी रस्त्यावर शुक्रवारी (दि. १४) रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
तुषार अशोक भोसले (वय २०, रा. बालिकाश्रम रस्ता, अहमदनगर) हा मंडप डेकोरेशनचे काम करत असतो. या कामाच्या माध्यमातून त्याची अक्षय राजेंद्र जाधव (रा. बालिकाश्रम रस्ता) याच्याशी ओळख होती. तुषार भोसले हा मिरवणुकीमध्ये रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास नाचत होता. मिरवणूक कोहिनूरजवळ आली असताना अक्षय या मिरवणुकीत नाचण्यासाठी आला. त्याचा धक्का लागल्याने त्याली नीट नाचण्यास सांगितले. या म्हणण्याचा त्याला राग आल्याने त्याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याच्याजवळ असलेल्या धारदार शस्त्राने उजव्या हातावर दंडावर वार केला. या वारामुळे दंडातून रक्त येण्यास सुरूवात झाली. जिल्हा शासकीय रूग्णालयात येऊन उपचार घेतल्यानंतर कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी अक्षय जाधव याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.