संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : दिवसा घरफोडी करून चोरी करणारा चोरटा २४ तासाच्या आत मुद्देमालासह पकडण्यात तोफखाना पोलिसांना यश आले आहे. राहुल मोहन फाटक (वय २०, रा. कांबी ता. शेवगाव जि. अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, नगर शहर डिवायएसपी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोनि मधुकर साळवे यांच्या सूचनेनुसार सपोनि नितीन रणदिवे, पोसई समाधान सोळंके, पोहेकॉ दत्तात्रय जपे, पोहेकॉ, सुनिल शिरसाट, पोना. संदिप धामणे, पोना. सुरज वाबळे, पो ना अविनाश वाकचौरे, पोना वसीम पठाण, पोना अहमद इनामदार, पोकाॅ दत्तात्रय कोतकर, पो.कॉ. शिरीष तरटे, पोकॉ सतीष भवर, पोकॉ सतीष त्रिभूवन, पोकॉ सचीन जगताप, पोकॉ गौतम सातपुते, पोकॉ चेतन मोहीते आदिंच्या ‘टिम’ने ही कारवाई केली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि. ५ एप्रिल २०२३ रोजी सकाळी १० ते १२.१५ वाजण्याच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने घराचा कडी कोंडा तोडून घरातील ३ लाख ६ हजार रु. कि चे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेली, या नवनाथ नवनाथ काळे (रा. स्वामी समर्थ नगर, तपोवन रोड अहमदनगर) यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुरनं: ३८०/२०२५ भा.द.वि. कलम ४५४,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दाखल गुन्ह्यातील वर्णनावरून गुन्ह्यातील आरोपी राहुल मोहन फाटक याला २४ तासात निष्पन्न करून पकडण्यात आले. आरोपीस तपोवन रोड येथून ताब्यात घेतले असता, आरोपीने गुन्हा केल्याची कबुली देऊन गुन्ह्यातील चोरी केलेला मुद्देमाल आरोपी याने काढून दिल्याने तो मुद्देमाल जप्त केला.
यात ४४ हजार रु.कि.चे सोन्याचे नेकलेस, ६४ हजार रु कि चे १६ ग्रॅम वजानाचे सोन्याचे कानातले, १ लाख ८ हजार रु कि २७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण, ४० हजार रु किची सोन्याची अंगठी १० ग्रॅम वजनाची, ११ हजार ५०० रु रोख रक्कम, १ लाख एक ॲक्सेस कंपनीची मोपेड बिना क्रमांकाची दुचाकी असा एकूण ३ लाख ६७ हजार ५०० मुद्देमाल तोफखाना पोलिसांनी हस्तगत केला.