संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर – पत्रकार दिनानिमित्त शुक्रवारी (दि.६) सायंकाळी शहरातील तोफखाना पोलिस ठाण्याच्या पोनि ज्योती गडकरी मॅडम यांच्या हस्ते अहमदनगर शहरातील वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक मिडिया व सोशल मीडिया संपादक, उपसंपादक, बातमीदार यांचा शाल, श्रीफळ,पेन व डायरी देऊन सत्कार करुन पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी तोफखाना गुन्हे शोध विभागाचे सपोनि सोळंके, पोकाॅं जपे, शिरसाट आदिंसह पोलिस कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी सत्कारमूर्ती पत्रकार लैलेश बारगजे, कुणाल जायकर, प्रा. सुभाष चिंधे, संत़ोष आवारे, सुशिल थोरात, सागर दुस्सल, उमेर सय्यद, मिलिंद देखणे, बाबा ढाकणे, अशोक झोटिंग, मयुर मेहता, मनोज मोतियानी, राम नळकांडे, सुभाष मुदळ, अमीर सय्यद, श्री. मेटे महाराज आदिंसह पत्रकार उपस्थित होते.