सोमराज बडे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
पाथर्डी : बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यामधील तारकेश्वरगड येथे मंगळवारी (२ मे) श्री संत नारायण महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात पार पडली.
वै.नारायणबाबा यांचे बीड, अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर भक्तपरिवार आहे. यावेळी तारकेस्वर संस्थांनचे मठाधिपती आदिनाथ महाराज शास्त्री यांनी उपस्थितीत भाविक भक्तांचे स्वागत केले. या कार्यक्रमाप्रसंगी प्रामुख्याने राज्यमंत्री सदीपांन भुमरे, खासदार सुजय विखे पा., आमदार मोनिका राजळे, मा आ.साहेबराव दरेकर, आ.भिमराव धोंडे, माजी जि.प. सदस्य शिवाजी नाकाडे, अहमदनगर भाजपाचे उपाध्यक्ष तथा युवानेते धनंजय बडे पा., राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ राजेंद्र खेडकर, चिंचपूर पांगुळ ग्रामपंचायत सदस्य विष्णू खाडे आदींसह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.