तलवार घेऊन फिरणा-यास तोफखाना पोलीसांच्या ताब्यात
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहिल्यानगर: घातपात करणा-याच्या उद्देशाने तलवार घेऊन फिरणा-यास तोफखाना पोलीसांनी ताब्यात घेतले.अक्षय अशोक टकले ( वय ३०, रा. निर्मलनगर, गाडेकर चौक, घर नं.५३ ता जि अहिल्यानगर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, अहिल्यानगर शहर डिवायएसपी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या सूचनेनुसार गुन्हे शोध टीमचे पोलीस उपनिरीक्षक शैलेश बी. पाटील, पो.हे.काॅ योगेश चव्हाण, सुनिल चव्हाण, अहमद इनामदार, वसिमखान पठाण, भानुदास खेडकर, सुमित गवळी, सतिप त्रिभुवन, सुजय हिवाळे, सतिष भवर, महेश पाखरे आदींच्या टीमने ही कारवाई केली.
दि.३० मार्च २०२५ रोजी रात्री ८.५५ वा.च्या सुमारास कृष्ठधाम रोड ते सोनानगर चौकाकडे जाणा-या रोडवर एक राखाडी रंगाचा टी शर्ट घातलेला इसम हातात एका पांढऱ्या रंगाच्या गोणीमध्ये तलवारी सारखे हत्यार घेऊन फिरत आहे, आत्ता गेल्यास मिळून येईल अशी माहिती मिळाल्याने गुन्हे शोध टीमने त्या ठिकाणी जाऊन सापळा लावून माहितीप्रमाणे तो हाच असल्याची खात्री झाल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव अक्षय अशोक टकले असे सांगितले, त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ १ हजार रु किं.ची २६ इंच लांबीची धारदार पाते असलेली तलवार त्यास पकडण्यासाठी पितळी मुठ व ठेवण्यासाठी लाल रंगाचे म्यान असलेली तलवार मिळून आली. इसमाविरुध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा रजि नं. ३४८/२०२५, आर्म ॲक्ट कायदा कलम ४/२५ प्रमाणे तसेच म.पो. अधि. कलम ३७(१),(३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ भानुदास खेडकर हे करत आहे.