संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
नगर ः भिंगार हद्दीतील आय लव्ह नगर चौक परिसरातील सबस्टेशनजवळ, काटवनात एक जणांकडून विक्रीसाठी आणलेल्या दोन धारदार तलवारी जप्त करून तत्यास अटक करण्याची कारवाई भिंगार पोलिसांनी केली आहे. तोसिफ मन्सुर सय्यद (वय 34, रा. घर नं. 35, श्रीकृष्ण नगर, नगर-कल्याणरोड, नालेगाव, अहिल्यानगर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे सपोनि जगदीश मुलगीर यांच्या आदेशानुसार पोहेकॉ दिपक शिंदे, रवी टकले, संदिप घोडके, पोकॉ प्रमोद लहारे, महादेव पवार, समीर शेख आदींच्या टीमने ही कारवाई केली. भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे तपास पथकातील अंमलदार यांनी बातमीतील नमुद ठिकाणी जाऊन सापळा लावला असता थोड्या वेळातच बातमीतील वर्णनाप्रमाणे एक ईसम काटवनातुन एक प्लॅस्टीकच्या गोणी घेऊन आला असता त्यास पोलीस आल्याची चाहुल लागताच तो पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यास जागीच पकडुन पंचासमक्ष गोणीची झडती घेतली असता त्यामध्ये दोन धारदार तलवारी मिळल आल्या.प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याने त्याच्याविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुरनं. 731/2024 भारतीय हत्यार कायदा कलम 4/25, भारतीय न्याय संहिता कलम 223 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.