…तर समाजकारण करण्यासाठी प्रताप ढाकणेंना आमदार करणे गरजेचे : प्रभावती ढाकणे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी : शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात दहा वर्षांत विकास झाला नाही. आमदारांनी तालुका भकास केला असल्याचा आरोप माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभावती ढाकणे यांनी केला. ढाकणे यांनी पंचायत समितीच्या कोरडगाव गणाचा दौरा केला. यावेळी ढाकणे यांनी हा आरोप केला.
यावेळी रत्नमाला उदमले, सविता भापकर, आरती निहऱ्हाळी, मनीषा ढाकणे, ज्योती जेधे, नवनाथ आंधळे, विजय आंधळे, भीमराव आंधळे, सिद्धेश दहिफळे, विशाल आंधळे, संजय दौंड आदी उपस्थित होते.
ढाकणे म्हणाल्या, की राजकारण
करण्यासाठी नाही, तर समाजकारण करण्यासाठी प्रताप ढाकणे यांना आमदार करणे गरजेचे आहे. त्यांना भेटण्यासाठी मध्यस्थाची गरज भासत नाही. स्व. ढाकणे यांनी अनेक पाझर तलाव करून लोकांच्या पाण्याची समस्या सोडवण्याचे काम केले. मात्र, दहा वर्षांत एकही तलाव राजळे यांना उभारता आला नाही. भगवानगड पाणी योजना मीच मंजूर केली, असे म्हणणाऱ्या राजळे यांना या योजनेची मुदत संपूनही अजून योजना सुरू करता आली नाही. मतदारसंघात हजारो तरुणांच्या हाताला काम नाही. मात्र, प्रताप ढाकणे यांनी बेरोजगारांचा मेळावा घेऊन अनेक तरुणांना नोकऱ्या दिल्या. रस्त्यांचे जाळे निर्माण केले, हा राजळे यांचा दावा खोटा आहे.
भूलथापा देऊन व खोटी आश्वासने देऊन निवडून येण्याचा त्यांचा उद्योग असला, तरीही या निवडणुकीत हा उद्योग आता बंद होणार आहे. मतदारसंघात आता बदल अटळ असून, या मतदारसंघाचा जर खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल, तर प्रताप ढाकणे यांच्याशिवाय पर्याय नाही, असेही ढाकणे म्हणाल्या.