तरुणांचे झाले कोळसे, जुन्यांना पडले वळसे, अहिल्यानगर शहर भाजपाची अवस्था !

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहिल्यानगर ः भाजपाचे जुने पदाधिकारी यांच्यामुळे पक्षाची अहिल्यानगर शहरात वाढीसाठी प्रयत्न नसताना तरुणांची या संदर्भातील मोठी पक्षाकडे सभासदत्व प्राप्त करण्यासाठी होरपळ होत आहे. भाजपा पक्षाने सभासदत्व अभियान दिल्ली ते गल्लीपयर्र्ंत राबविण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरुन गावपातळीपयर्र्ंत संगणकप्रणालीचा पुरेपूर वापर करून पक्षाला नवीन सभासदत्व देण्यासाठी प्रयत्न केले. पण अहिल्यानगर शहरात यांचा पूर्णपणे तीन वेळा मुदत वाढ देऊन सुद्धा बोजवारा उडालेला दिसतो.

त्यानंतरच्या बुथ प्रक्रियेमधून मागील वर्षात बुथरचनेत असणारे कार्यकर्तेे व पदाधिकारी यांच्या नेमणूका तशाच ठेवलेल्या दिसतात. यातून प्रदेशास्तरावरुन वारंवार विचारणा होऊन सु्द्धा भाजपा पक्षाचे स्थानिक पदाधिकारी व निवडणूक प्रक्रियेत अहिल्यानगर शहरात सामाविलेले पदाधिकारी या मागील बुथरचनेचा अवलंब करण्यात धन्यता मांडीत आहेत. यावरुन भाजपा पक्षाला जुन्या पदाधिकारीच अध्यक्षपदावरुन चर्चेेत राहिले आहेत. नवीन काम करणार्‍या पदाधिकार्‍यांना कुठलीच पद मिळण्यासाठी प्रदेशस्तरावरुन हालचाली होतांना दिसत नाही.यामधून मराठीत म्हण ‘तरुण तर्क, म्हातारा अर्क’ यांचा अहिल्यानगर शहरात प्रत्यय दिसत आहे. अहिल्यानगर भाजपामध्ये वारंवार अध्यक्षपदाला नवीन मंडल अध्यक्ष निवडी संदर्भात निरीक्षक म्हणून जुन्या पदाधिकार्‍यांचा मंडल प्रक्रियेत उपयोग करुन घेतला जात आहे. नुकत्याच संपलेल्या संसदीय अधिवेशनात सपाचे खासदार यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना या संदर्भात चिमटा घेऊन अवगत देखील केले होते. त्यातून त्यांनी भाजपाच्या संसदीय प्रणाली प्रमाणे भाजपा पक्षाच्या रचनेच्या आधारावर उत्तर दिले होते.
हा भाजपा पक्ष याच रचनेनुसार लोकसभेत पराभूत व विधानसभेत इतर पक्षांशी युती करुन कुठेही निवडणूक प्रक्रियेत सामावून न घेता इतर आमीषावर विधानसभेत देखील पराभूत अवस्थेत अहिल्यानगर शहरात पाहायला मिळत आहे. वय वर्षेे 42 ते 50 च्या दरम्यान (वयोमनाचा) शहराध्यक्ष (महानगराध्यक्ष) केला तर यांच्या अहिल्यानगर शहरात भाजपा पक्षाच्या वाढीसाठी प्रयत्न केले दिसतील, व यातून भाजपा पक्षाचा मताचा टक्का देखील सुधारलेला दिसेल! तो अध्यक्ष सामान्य कुटुंबातील असावा. निवडणूक हे उद्दिष्ट त्याच्यासमोर नसून, भाजपा पक्षाची वाढ होण्यास निश्‍चित प्रयत्न करणार असावा.
अहिल्यानगर जिल्ह्याची कोअर कमिटी ही याबाबत प्रदेशास्तरावरुन सकारात्मक दृष्ष्टीकोन ठेवून कार्य करत आहे. पण जिल्ह्यातील काही नेत्याचे संसदीय कामकाज हे देखील पूर्णतःकडे व संसदीय कामकाज हे देखील पूर्णतःकडे जाताना दिसत नाही. या तरुणांचा भाजपा पक्षामध्ये वापर कमी करुन जुन्या पदािधिकारर्‍यांनी स्वतःची प्रसिद्धी करण्यात धन्यता मांडली आहे. पण याचा भाजपा पक्षाला कुठल्याही प्रकाराचा फायदा होताना दिसत नाही. कारण प्रभाग 1,2 व 3 निवडणुकामध्ये दिसत नाही, प्रभाग क्र.4 यामध्ये एका सदस्यांचे विजयी अस्तित्व राहून ते अनेक तत्सम घडामोडी घडून देखील विलीन झाले आहेत. ही पार्श्‍वभूमी पक्षाला माहिती असून, सर्व पक्षाच्या पदाधिकार्‍यांना परचित आहे. यामध्ये पक्षाच्या वाढीचा कोणताही पायलट प्रोजेक्ट देखील राबविण्यात आला नाही. मागील निवडणुकामध्ये प्रभाग 4,5 व 6 चा विजयी रथ ओढून आणला खरा, पण यावषार्र्ंमध्ये यातील कामकाज रामभरोसे चालू आहे. यावरुन पक्षाची सभासद अभियान प्रक्रिया या जुन्या पदाधिकार्‍यंानी अडकून ठेवण्यात भाजपा पक्षाच्या वाढीस स्वलपविराम देऊन विरमाकडे ओढून नेणण्याचे ठरिविले आहे का?… यानिमित्ताने आता अहिल्यानगर भाजपामध्ये मागील गोल्डन गॅँग हटवा… नगर शहरातील भाजपा वाचवा… अशी दबक्या आवाजात पक्षाचे कार्यकतत्यार्र्ंमध्ये सुरु आहे.      (क्रमाशः)

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,300SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!