डॉ. वंदनाताई जगताप-फाटके यांच्या उपस्थितीत
विद्याविहार सोसायटीतील दत्त मंदिरात दीपोत्सव संपन्न
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहिल्यानगर : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दिल्ली गेट बालिकाश्रम रोड येथील विद्याविहार सोसायटीतील श्रीदत्त मंदिर येथे सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील विद्याविहार सोसायटीचे चेअरमन राजेंद्र येंडे आणि सेक्रेटरी शैलेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सोसायटीतील सर्व परिवारातील सदस्यांनी एकत्र येत दीपोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला.
यावेळी नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या भगिनी डॉ. वंदनाताई जगताप-फाटके तसेच डॉ. फाटके यांनी या उत्सवामध्ये उपस्थित राहून श्री दत्तगुरूंचे आशीर्वाद घेतले. यावेळी सोसायटीमध्ये जमलेल्या सर्व महिलांची त्यांनी आवर्जून भेट घेत आपुलकीने विचारपूस केली तसेच सोसायटीमार्फत दरवर्षी होणाऱ्या दीपोत्सव सोहळ्याचे कौतुक केले.
राजेंद्र येंडे परिवाराच्या वतीने डॉ. वंदनाताई आणि डॉ. फाटके यांचा सत्कार करण्यात आला. सोसायटीतील महिलांनी डॉ. वंदनाताई यांना शुभेच्छा देऊन आमदार संग्राम जगताप यांच्या विजयासाठी श्री दत्तगुरूंकडे मनोभावे प्रार्थना केली. संग्राम जगताप अहिल्यानगर शहरातून भरघोस मतांनी विजयी होण्यासाठी विद्याविहार परिवारातील सर्व सदस्यांचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले.
दीपोत्सवानिमित्त श्री दत्त मंदिर आणि परिसरात आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली होती, डॉ. वंदनाताई यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून दीपोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. 1001 दिवे लावून मंदिर प्रकाशमय करण्यात आले होते. विद्याविहार सोसायटीसह सर्वोदय सोसायटी, गृहशिल्प सोसायटी, बालिकाश्रम रोड, बागरोजा हाडको या परिसरातील नागरिकांनी श्री दत्त दर्शनासाठी गर्दी केली होती. दीपोत्सवाच्या कार्यक्रमानंतर सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सोसायटीतील असीम भोपे, हेमंत व्यापारी, सचिन देशपांडे, शैलेश कुलकर्णी, सुनील होशिंग, दीपक कुलकर्णी, सुरेश होसिंग, सागर कदम, गौरव गटणे, भरत शिराळकर, श्रीकांत वांढरे, तेजस शेटे, सोनी साहेब, संभव काठेड, शंभू सुरसे, गणेश ठाणगे, शिवाजी ठाणगे, विशाल येंडे, रोहित जंगम, रोहित देशपांडे, संकेत होसिंग, यथार्थ परदेशी, गणेश वाघ, महेश सुरसे, राजेंद्र भिसे, ओंकार कवडे आदी परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
तसेच विद्याविहार जेष्ठ नागरिक मंचाचे शंकर व्यापारी, सर्जेराव शेटे, चंद्रकांत येंडे गुरुजी, सप्तर्षी गुरुजी, कुमार काका, कांबळे साहेब या सर्व ज्येष्ठ नागरिकांनी आमदार संग्राम जगताप यांना अहिल्यानगर विधानसभा निवडणुकीमध्ये विजयी होण्यासाठी शुभाशीर्वाद दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोसायटीचे सेक्रेटरी शैलेश कुलकर्णी आणि संकेत होशिंग यांनी केले. कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार राजेंद्र येंडे यांनी मानले.
पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.