👉न्यायालयाचा निकाल महापालिकेच्या बाजूने ; जल्लोष.
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर – अहमदनगर शहरातील नगर औरंगाबाद या महामार्गावरील मार्केटयार्ड समोरील हॉटेल सुखसागर व महापलिका अनेक वर्षांपासून जागेवरून औरंगाबाद हायकोर्टातमध्ये वाद सुरू होता. या ठिकाणी सध्या हॉटेल सुखसागर आणि त्या शेजारील जागेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धकृती पुतळा अशी परिस्थिती होती.मात्र या ठिकाणी पूर्ण कृती पुतळा उभारून बाकीच्या जागेत बगीचा आणि सुशोभीकरण करावे, अशी अनेक वर्षापासून आंबेडकरी अनुयायांची मागणी होती. यासाठी अनेक वेळा आंदोलनेही झाली होती. मात्र हे प्रकरण न्यायालयात असल्यामुळे महानगरपालिका त्या ठिकाणी काहीच करू शकत नसल्याने अखेर औरंगाबाद हायकोर्टात या प्रकरणाचा निकाल लागला असून हा निकाल महानगरपालिकेच्या बाजुने लागला असल्याची माहिती आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते अजय साळवे यांनी दिली आहे.
गेल्या पंचवीस वर्षापासून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते या जागेसाठी लढा देत होते अनेक वेळा महानगरपालिकेत या ठिकाणी पूर्ण कृती पुतळा बसवण्याचा ठराव मंजूर झाला होता अनेक महापौरांनी यासाठी प्रयत्नही केले होते शहराचे आमदार संग्राम जगताप तसेच आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी मध्यंतरीच्या काळात एक बैठक घेऊन हा पुतळा मार्केट यार्ड समोरील जागेतच बसवण्याची ठाम भूमिका घेतली होती. त्यामुळे गेल्या तीन महिन्यापासून औरंगाबाद हायकोर्टात एडवोकेट होन आणि महानगरपालिकेचे एडवोकेट लोखंडे यांनी बाजू लावून धरली होती. त्यामुळे तीन महिन्यातच या प्रकरणाचा निकाल लागला असून आता आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे स्वप्न पूर्ण होईल यासाठी इतर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पेढे भरून फटाके वाजवून जल्लोष साजरा करताना आमदार संग्राम जगताप, अशोक गायकवाड, परिमल निकम, सुरेश बनसोडे, अंकुश मोहिते, निलेश बांगरे, योगेश थोरात, सिद्धार्थ आढाव, सागर ठोकळ, संतोष जाधव, मनोज साठे, सिद्धार्थ पाटोळे, गौतमी भिंगारदिवे,कौशल गायकवाड, पवन भिंगारदिवे, विशाल भिंगारदिवे, सुहास पाटोळे, समीर भिंगारदिवे, सुजन भिंगारदिवे, निखिल चाबुकस्वार, वीरू चव्हाण, दीपक ससोदे, गजू गायकवाड आदीसह आंबेडकरी समाज बांधव उपस्थित होते.