डॉक्टरांने लालसेपोटी केलेला उद्योगामुळे २०० रुग्णांनी जीव गमावला ; पहा तर ही कुठली घटना

डॉक्टरांने लालसेपोटी केलेला उद्योगामुळे २०० रुग्णांनी जीव गमावला ; पहा तर ही कुठली घटना
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
इटावा :  सैफई मेडिकल कॉलेजच्या एका डॉक्टरने परदेशात जाण्याच्या लालसेपोटी गरीब रुग्णांच्या जीवाशी खेळला आहे. डॉ. समीर सराफ या महाशयाने जवळपास ६०० रुग्णांना खोटे पेसमेकर लावले. त्यामुळे आतापर्यंत २०० रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्या महाशय डॉक्टरला पोलिसांनी अटक केली असून, त्या महाशय डॉक्टरचे समीर सराफ असे त्याचे नाव आहे. त्याला खोटे पेसमेकर लावल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील इटावा या ठिकाणी ही घटना घडली आहे.


याबाबत समजलेली माहिती अशी की, सैफई मेडिकल महाविद्यालयाच्या कार्डिओलॉजी विभागात कार्यरत असणाऱ्या डॉ. समीर सराफ यांनी एसजीपीजीआयने निश्चित केलेल्या किंमतीपेक्षा जास्त दराने रुग्णांना खोटे पेसमेकर बसविले होते. रुग्णाच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर सैफई मेडिकल कॉलेज प्रशासनाने चौकशी समिती स्थापन केली होती. यानंतर चौकशीत रुग्णांनी केलेली तक्रार खरी असल्याचे निष्पन्न झाले. त्यात निश्चित केलेल्या किंमतीपेक्षा ९ पट जास्त किंमत आकारण्यात आल्याचे चौकशी समितीच्या तपासातून उघड झाले असून, ते खोटे पेसमेकर असल्याचे ही समोर आले आहे. यानंतर तज्ज्ञांचे राज्यस्तरीय तपास पथक तयार करण्यात आले. तसेच सैफई वैद्यकीय महाविद्यालयाचे तत्कालीन कुलसचिव सुरेश चंद शर्मा यांनी तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक प्रा. डॉ.आदेश कुमार यांना पत्र लिहिले होते. ज्यात ही बाब रुग्णालयाशी संबंधित असल्याचे म्हटले होते.


या प्रकरणाचा तपास पीजीआय पोलीस चौकीचे तत्कालीन प्रभारी उपनिरीक्षक केके यादव यांनी केला आणि गुन्हा दाखल करण्यात आला होता. सैफई मेडिकल कॉलेजच्या कॅथ लॅबसाठी एक ते दीड वर्षाची उपकरणे उपलब्ध असूनही डॉ. समीरने २०१९ मध्ये जवळपास १ कोटी रुपयांची अनावश्यक उपकरणे खरेदी केल्यांचा आरोप करण्यात आला. यामध्ये डॉ. समीरने २०१९ मध्ये सुमारे १ कोटी रुपयांची अनावश्यक उपकरणे खरेदी केल्याचा त्यांच्यावर करण्यात आला. यात डॉ. समीरने लाखो रुपयांची हेराफेरी केली असून मेडिकल कॉलेजच्या प्रशासनाने अनेक पातळ्यांवर चौकशी केल्यानंतर पेमेंट थांबवले होते, यासंदर्भात २४ डिसेंबर २०२२ रोजी स्पीड पोस्टद्वारे पाठवण्यात आली होती.
मध्य प्रदेशातून परतलेले उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य गुरुवारी सैफई हवाई पट्टीवर काही काळ थांबले होते. तेव्हा मुख्यमत्र्यांना डॉ. समीरच्या बाबतीत प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, ज्या लोकांना या समस्यांचा सामना करावा लागला आहे. त्या सर्वांना सरकार शोधून काढेल आणि त्यांचे प्राण वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. कुलसचिव डॉ. चंद्रवीर सिंग म्हणाले, डॉक्टर समीर तुरुंगात असून या प्रकरणासंबंधितचा निर्णय कार्यकारिणीच्या बैठकीत घेतला जाईल.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!