डिवायएसपी अनिल कातकाडे यांचा निरोप समारंभ संपन्न
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : पोलिसांची जनतेमध्ये विश्वासार्हता टिकविण्यासाठी मी नेहमी तत्पर राहिलो. सर्वसामान्यावर अन्याय झाला नाही पाहिजे, अधिकारी पदावर काम करत असताना यासाठी मी सदैव माझ्यातील कर्तव्यपणा जागृत ठेवला. याच पद्धतीने सर्व पोलिस कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावावेत, असे प्रतिपादन मावळते नगर शहर डिवायएसपी अनिल कातकाडे यांनी केले.
डिवायएसपी अनिल कातकाडे हे वर्षाअखेर निवृत्त होत असल्याकारणाने नगर शहर उपविभागीय कार्यालयाच्या वतीने आयोजित निरोप समारंभा कार्यक्रमाप्रसंगी श्री कातकाडे बोलत होते.
दरम्यान डिवायएसपी श्री कातकाडे यांचा सपत्नीक नगर शहर उपविभागीय कार्यालयाच्या कर्मचारी वृदांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या दरम्यान कार्यालयातील अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी पीएसआय दत्तात्रय शिंदे, एफएसआय राजू भालसिंग, पोहेकाॅ राजू जाधव, सागर द्वारके,
संतोष ओव्हाळ, बाबासाहेब फसले, गणेश चव्हाण,
सचिन जाधव, महेश मगर, सुयोग सुपेकर, पोना किरण बनसोडे, हेमंत खंडागळे, जालिंदर पालवे, मपोकाॅ. सानली भागवत, राधिका वाघ, दीपाली भालेराव, पूनम टिळेकर, कोतवालीचे पोकाॅ योगेश भिंगारदिवे व डिवायएसपी अनिल कातकाडे यांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.