डाॅ.आठरे मित्र मंडळातर्फे नगर शहराविषयी निबंध स्पर्धा नगरकरांनो मोठ्या संख्येने निबंध स्पर्धेत सहभागी व्हा !! : डॉ. अनिल आठरे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर – डॉ. अनिल आठरे पाटील मित्र मंडळाच्या वतीने शहरात खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत नगरकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावी, असे आवाहन डॉ. अनिल आठरे यांनी पत्रकार परिषदेत केले.
नगरच्या बाजूच्या शहरांचा अभ्यास केला असता त्यांच्या तुलनेने नगर शहराचा विकास म्हणावा असा झालेला दिसत नाही , ऐतिहासिक दृष्ट्या अहमदनगर शहराचे नाव अजरामर आहे परंतु एवढा मोठा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा असतानाही शहराचा सामाजिक, आर्थिक शैक्षणिक आणि औद्योगिक विकास झाला नाही .
शहराची मागील ५० वर्षाची प्रगती अत्यंत निराशा जनक आहे. खड्डेमय रस्ते ,रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य , सदोष ड्रेनेज सिस्टीम ( सांडपाणी समस्या ), दूषित पिण्याचे पाणी , गुन्हेगारी आणि दहशत, जमिनीची ताबीमारी , बेरोजगारी , रखडलेला औद्योगिक विकास असे एक ना अनेक प्रश्न सामान्य नागरिकांना भेडसावत आहेत, या सगळ्या प्रश्नांच्या दुष्टचक्रातून नगरकरांना बाहेर यायचे असेल , आपले व आपल्या पुढच्या पिढीचे जीवन सुखकर करायचे असेल तर आत्ताच रोखठोक निर्णय व भूमिका घ्यावी लागेल असे परखड मत मानसिंगराव आठरे यांनी यावेळी मांडले . या निराशामय व भकास वातावरणा बाहेर पडण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करावे लागतील.नगरकरांची हीच खंत आणि विकासाचे स्वप्न आणि संकल्पना कुठेतरी पुढे यायला हवी त्याला हक्काचे व्यासपीठ मिळायला हवे या उद्देशाने ही निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आयोजित डॉ. अनिल आठरे यांनी सांगितले
निबंधाचे विषय १ – माझ्या स्वप्नातील अहमदनगर शहर २ – माझ्या स्वप्नातील माझा प्रभाग किंवा वार्ड ( हा निबंध लिहिताना आपला प्रभाग क्रमांक लिहावा )
प्रथम पारितोषिक 7000 रुपये व स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र दुसरा क्रमांक ५००० हजार रुपये स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र , तिसरा क्रमांक ३००० रुपये स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र तर ४ पारितोषिके उत्तेजनार्थ देण्यात येतील प्रत्येकी १००० रुपये स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र.
आपण आपला निबंध 12 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर यादरम्यान आठरे पाटील मेमोरियल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर प्राण झोपडी कॅन्टीनसमोर सावेडी रोड अहमदनगर या ठिकाणी किंवा events@anilathare.com या मेलवर पाठवावीत.असे आवाहन करण्यात आले आहे.