टिपर चोर नांदेड स्क्रप दुकानात रेडहॅण्ड कॅच ः नगर तालुका पोलिसांची कामगिरी

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा 
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर ः   टिपर चोरीकरुन नांदेड येथे स्क्रॅप करताना छापा टाकून पकडण्याची कारवाई नगर तालुका पोलीसांनी केली आहे. अख्तरखा ताहेरखा पठाण (वय 55, रा. पीरबुर्‍हाननगर नांदेड), गजानन संभाजी भोसले (वय 33, रा. सुहगण ता. पूर्णा जि. परभणी) अशी  पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्या दोघा चोरट्यांना 4 दिवस पोलीस कोठडी सुुनावली आहे. 
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, नगर ग्रामीण डिवायएसपी संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलिस ठाण्याचे  सपोनि शिशिरकुमार देशमुख यांच्या सूचनेनुसार पोउनि युवराज चव्हाण, पोहेकॉ सुभाष थोरात, पोकॉ कमलेश पाथरुट, सोमनाथ वडणे, संभाजी बोराडे, सागर मिसाळ व मपोहेकॉ कविता हरिशचंद्रे यांच्या टिमने ही कारवाई केली. 
 याबाबत समजलेली माहिती अशी की,  मी रात्री 8.30 वाजता मी  व माझा ड्रायव्हर असे आमचे टाटा कंपनीचा टिपर (ट्रक एमएच 16 ट 7978) हा विट कामाचे भाडे करुन नेहमीप्रमाणे आरणगाव, चौकाजवळील इसार पेट्रोल पंपावर लावून वाहन लॉक करुन आम्ही आमचे घरी निघून गेलो. त्यानंतर सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास मला माझ्या मोबाईलवरीती टिपरच्या जिपीएसचा मॅसेज आल्याने मी लगेच पार्क केलेल्या आरणगाव चौकाजवळ इसार पेट्रोल पंपावर जाऊन पाहणी केली. मला त्या ठिकाणी माझा टिपर दिसला नाही. मी आजूबाजूला चौकशी केली असता मला टिपर आढळून आला नाही.या  दि. 1 ऑक्टोबर 2023 रोजीे ज्ञानेश्वर बाळू कुंजीर (रा. बाबुर्डी घुमट, अहमदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात  गुरंन 755/2023 भादवी कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचे गांर्भिय लक्ष्यात घेऊन सपोनि शिशिरकुमार देशमुख यांनी नगर तालुका पोलिसांची टिम तयार केली. त्या टिमने टिपरला लावलेले जिपीएस चेक केले असता, जीपीएस हे माजलगांव (जि. बीड) येथेच बंद केले असलेचे समजले. त्यानंतर नगर तालुका पोलिसांनी रोडवरील सीसीटीव्ही कॅमेरे चेक करुन चोरी गेलेला डंपरचा रोड रुट फिक्स केला. त्यावेळी पोलिसांना समजले की, गुन्हयातील चोरी गेलेला टंपर हा नांदेडच्या दिशेने गेलेला आहे. त्यानुसार पोलीसांनी हे नांदेड येथे जाऊन नांदेड एलसीबी टिमच्या मदतीने भंगार दुकानावर कुठे टिपर स्क्रॅप करतात याची माहिती घेत असताना माहिती मिळाली, की गुन्हयातील चोरी गेलेला टिपर हा नांदेड येथील लातूर रोडवरील एका भंगारच्या दुकानामध्ये स्क्रॅप करण्याचे काम चालू आहे. त्यानुसार नगर तालुका पोलीस  हे तात्काळ भंगारच्या दुकानावर जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी चोरी गेलेला टिपरची दोनजण तोडफोड करुन स्क्रॅप करताना मिळून आले. या ठिकाणी मिळून आलेल्या इसमाला ताब्यात घेऊन त्याचे नाव व गाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव अख्तरखा ताहेरखा पठाण  व गजानन संभाजी भोसले असल्याचे सांगितले. त्याना गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्यातील चोरी गेलेला टिपर हाच असून तो आंम्ही दोघानी अहमदनगर जिल्हयातील अरणगाव चौक येथील इसार पेट्रोलपंपाजवळून चोरी केलेला आहे, अशी कबुली दिली. त्यानंतर आरोपी व चोरी गेलेल्या टिपरची चेसी बॉडी व इतर साहित्य असे साहित्य घेऊन नगर तालुका पोलीस ठाण्यात जमा केलेले आहे. गुन्ह्याचा तपास मपोहेकॉ कविता हरिशचंद्रे हे करीत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!