ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर – महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई व दै. मराठवाडा साथीच्या वतीने देण्यात येणाऱ्या सकारात्मक लेखन या विषयावरील राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त मान्यवरांची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये पशुश्चिम महाराष्ट्र विभागीय पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार सुभाष चिंधे यांना जाहीर करण्यात आला आहे.
दै. मराठवाडा साथीचे संस्थापक संपादक स्व. मोहनलालजी बियाणी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मागील दोन वर्षांपासून पुरस्कार देण्यात येत आहेत. दर्पण दिनाच्या पार्शवभूमीवर पुरस्कार प्राप्त मान्यवरांच्या नावाची घोषणा केली. सकारात्मक लेखन हा विषय पुरस्कारासाठी ठेवला होता. निवड समितीने पुरस्कारांसाठी आलेल्या साहित्यांचे परीक्षण करून चिंधे यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. चिंधे यांना यापूर्वी महाराष्ट्र शासनाचा तंटामुक्ती जिल्हा पुरस्कार, शिवशंभो प्रतिष्ठाण व आष्टी तालुका मित्र मंडळाचा राज्यस्तरीय शिवशंभो पत्ररत्न पुरस्कार, हरिहरेश्वर ग्राम विकास प्रतिष्ठाणचा समाजरत्न पत्रकारिता राज्यस्तरीय पुरस्कार, संत शिरोमणी रोहिदास महाराज पत्रकार भूषण पुरस्कार मिळालेला आहे.