मराठी पत्रकार परिषद : कर्जत येथे राज्यस्तरीय मेळावा
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : ज्याचे हृदय जळते, ते लिहिण्याची क्षमता ज्यांच्याजवळ आहे तो पत्रकार आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कार्य. संपादक तथा खा संजय राऊत यांनी केले.
कर्जत येथे शारदाबाई पवार सभागृहात अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेतर्फे आयोजित राज्यातील तालुका पत्रकार संघांचा राज्यस्तरीय मेळावा आणि आदर्श तालुका व जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
खा.राऊत पुढे म्हणाले की, माझे पत्रकारितेकडे दुर्लक्ष झाले नाही. मध्यंतरी मला जेलमध्ये काहींनी पाठवलं, असतानाही मी अग्रलेख लिहित होता. पत्रकारांना असत्यांच्या भिंती उभ्या आहेत. ज्याने बोलला पाहिजे त्यांच्या तोंडाला कुलूप लावलं आहे. या देशात न्यायालये लोकांची राहिली नाहीत. ज्यांना उत्तम पत्रकारिता करायची त्यांनी टिव्ही पाहायचा नाही. आज बोलण्यावर, लिहिण्यावर बंधनं येत आहेत. वृत्तसंस्था राजकीय लोक नेमतात, या पत्रकारीतेचा विरोध करतो. लिहिण्याला, बोलण्याला बंधनं येतात, ही हुकुमशाही आहे. महाराष्ट्राला पत्रकारितेला मोठी परंपरा आहे. सत्य लिहीले म्हणून, १२०० पत्रकारांवर खोटे गुन्हा दाखल झाले. सगळ्या राजकीय पक्षांनी टिका सहन करुन संयम पाळली होती. पत्रकारांना पत्रकारिता करु द्यावी, मालकांनी एजंटगरी करण्यास सांगू नये. ग्रामीण भागातील पत्रकार ही अन्याय विरोधात लढणारी फौज आहे. माझे आजही शस्त्र माझी लेखणी आहे. हवा ते करुन दाखवण्याची ताकद वृत्तपत्रात आहे, असे ज्येष्ठ कार्य. संपादक संजय राऊत शेवटी सांगितले.
स्वागताध्यक्ष आ.रोहित पवार म्हणाले की, या देशातील नवीन समीकरणांमध्ये महत्त्वाचा दुवा हे कार्य.संपादक तथा खा. संजय राऊत यांचा होता. पूर्वी अभ्यास, तपासणी व शोध घेतला जात होता. पण ती परिस्थिती आता राहिली पाहिजे, असे मत मांडले. जे आहे ते दाखवा, किंवा प्रिंट करा. साडेतीनहून साडेपाच टक्क्यांपर्यंत बेरोजगारी आली आहे. यावर लिहा, राज्यकर्तेवर दबाव वाढविला पाहिजे. लोकांचे ओपीनन बदलण्याची क्षमता पत्रकारांमध्ये आहे. तुम्ही बोला, तुमचा लोकांचा विश्वास आहे. लोकशाही टिकवण्यासाठी फ्रिडम देण्याची गरज आहे. पत्रकारांनी एकत्रित आले पाहिजेत. पत्रकारांच्या कायद्यासाठी सभागृहात लढू, अशी ग्वाही आ.पवार यांनी दिली.
मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी पत्रकारांचे येणाऱ्या अडचणीचा सोडविण्यासाठी प्रश्न राज्यसभेत उपस्थित करावा, अशी मागणी दै.सामनाचे कार्य.संपादक तथा खा. संजय राऊत यांच्याकडे केली.
ते पुढे म्हणाले की, पत्रकारांच्या पेन्शन समस्या, पत्रकारांवरील हल्ले वाढले आहेत. कायदा झाला पण त्या कायद्याची अंमलबजावणी होत नाही, उलट पत्रकारांची बदनामी केली जाते. पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी होत नाही. पत्रकारांना काम करणे अवघड आहे. महाराष्ट्र २०१९ ला पत्रकार पेन्शन समस्या व अडचणी समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. ९८ टक्के पत्रकारांना योजना मिळत नाही, महाराष्ट्र २०० ते २५० पत्रकार पेन्शनसाठी निश्चित असताना पैसे नाही, असे सांगितले जाते, यासह विविध प्रलंबित अडचणी सोडविण्यासाठी हा प्रश्न राज्यसभेत उपस्थित करावा.
दरम्यान मेळाव्यामध्ये मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दरवर्षी सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या तालुका आणि जिल्हा संघांना वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ आणि रंगा आण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आहे. यंदाचा आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार रत्नागिरी जिल्हा पत्रकार संघाला देऊन सन्मानित केला.
परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सुरभाई शेख, नाशिक विभागीय सचिव रोहिदास हाके, नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य,
अहमदनगर जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ संपादक सुभाष गुंदेचा, अहमदनगर प्रेस क्लबचे अध्यक्ष विठ्ठल लांडगे आदिंसह राज्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान पुरस्काराचे मानकरी तालुके पुढील प्रमाणे
नागपूर विभाग : मोहाडी तालुका पत्रकार संघ जिल्हा भंडारा अमरावती विभाग : धामणगाव तालुका पत्रकार संघ, जिल्हा अमरावती लातूर विभाग : औंढा नागनाथ तालुका पत्रकार संघ जिल्हा हिंगोली नाशिक विभाग : अमळनेर तालुका पत्रकार संघ, जिल्हा जळगाव पुणे विभाग : पुरंदर तालुका पत्रकार संघ जिल्हा पुणे कोल्हापूर विभाग : जत तालुका पत्रकार संघ, जिल्हा सांगली औरंगाबाद विभाग : पैठण तालुका पत्रकार संघ, जिल्हा औरंगाबाद कोकण विभाग : महाड तालुका मराठी पत्रकार संघ जिल्हा रायगड आदिंचा सन्मान करण्यात आला.
प्रास्ताविक शरद पाबळे यांनी केले. भाषणे कर्जत नगरपालिका नगराध्यक्षाउषाताई राऊत यांनी केलं.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी कर्जतमधील पत्रकार गणेश जेवरे, आशिष बोरा, योगेश गांगर्डे, भाऊसाहेब तोरडमल, मच्छिंद्र अनारसे, मोतीराम शिंदे, अस्लम पठाण, जामखेडचे पत्रकार अविनाश बोधले,सुदाम वराट, अशोक वीर, किरण रेडे, पप्पूभई सय्यद यांच्यासह सर्व स्थानिक पत्रकार तसेच जिल्ह्यातील पदाधिकारी यासाठी परिश्रम घेतले.