‘अनाथांची आई’ सुलाबाई (आत्या) कोहिनकर यांच्या स्मरणार्थ आज माऊली सभागृहात भव्य कार्यक्रम
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : अनाथांच्या भल्यासाठी आयुष्यभर झटत राहणाऱ्या सुलाबाई (आत्या) कोहिणकर यांच्या स्मरणार्थ ज्ञान समृद्धी बहुउद्देशीय प्रतिष्ठान च्या वतीने देण्यात येणारा ‘ज्ञानतीर्थ’ जीवन गौरव पुरस्काराचे आज दुपारी ३ वाजता माऊली सभागृहात वितरण होणार आहे. स्वतः अंध असलेले आणि अंधत्वांच्या प्रश्नासाठी लढणारे संभाजी भोर यांना हा जीवनगौरव पुरस्कार देण्यात येत आहे.
आमदार निलेश लंके, दैनिक सकाळचे आवृत्तीप्रमुख प्रकाश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमास गावरान मेवा या वेब सिरीजचे दिग्दर्शक किरण बेरड, संस्थेचे सचिव बाळासाहेब सांडभोर हे देखील उपस्थित राहणार आहेत. शहरातील माऊली सभागृहात पार पडणाऱ्या या सोहळ्यात अंधत्वांसाठी अविरत काम करणाऱ्या संभाजी भोर यांचा ‘ज्ञानतीर्थ’ जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह, रुपये पाच हजार आणि प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार सोहळ्यानंतर ‘ज्ञानतीर्थ’ इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत, तरी या सोहळ्यास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ‘ज्ञानतीर्थ’ काॅलेजच्या प्राचार्या सीमा अनुराज कोहिनकर यांनी केले आहे.