👉प्रबोधनाने सावित्री उत्सवाची सुरुवात
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : नगर विचारधारा, जिज्ञासा अकादमी व विविध संस्था संघटनांच्या वतीने होणाऱ्या सावित्री उत्सव निमित्त शहरातील निवडक शाळेतून ‘ज्ञानक्रांती ज्योत’ प्रबोधन करीत फिरणार आहे. त्याचे उदघाटन आमदार संग्रामभैया जगताप यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष अनिल जावळे, अध्यक्ष विठ्ठल बुलबुले ज्योत प्रमुख श्रीकांत वंगारी यांनी दिली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सावित्री उत्सवाचे माजी स्वागताध्यक्ष अविनाश घुले, धनंजय जाधव, यांच्यासह अहमदनगर शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर व शालेय विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत.
दि. १३ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी १०वा. माळीवाडा येथील म. फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मशाल मिरवणुकीला सुरूवात होईल यावेळी आमदार संग्रामभैया जगताप व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना ज्योत सोपवतील व मिरवणुकीला प्रारंभ होईल.
ही ज्योत १३ डिसेंबर ते ३जानेवारी विविध शाळेत जाणार आहे. ज्या ज्या शाळेत ही ज्योत जाईल तिथे ज्योतीचे मोठ्या प्रमाणत स्वागत केले जाणार असून त्यावेळी शाळेतील मुलेमुली, शिक्षक, मुख्याध्यापक आदी सावित्रीबाई फुले यांच्या कार्य कर्तृत्वावर, बोलतील व शेवटी सावित्री उत्सवाचे अध्यक्ष व प्रसिद्ध वक्ते विठ्ठल बुलबुले आपल्या भाषणाने समारोप करतील.
या ज्योतीचे उदघाटन समारंभाला व नंतरच्या कार्यक्रमांना सावित्रीबाईंचा वारसा मानणाऱ्या सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन संगीताताई गाडेकर, नंदाताई माडगे, सुरेखा घोलप,कल्पना बुलबुले प्रकाश कोटा, श्रीनिवास बुलबुले, तारिक शेख, सविता कोटा, वर्षा वांगर राजेंद्र बुलबुले आदींनी केले.