जेष्ठ नागरिक, दिव्यांगांना घरानजीकच्या लसीकरण केंद्रांवर लस मिळणार

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क

दिल्ली – आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगजनांना लसीकरण केंद्रे घराजवळ उपलब्ध करून देण्याबाबत जारी केलेल्या निर्देशांचे स्वागत करीत केंद्रिय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्य मंत्री रतन लाल कटारिया म्हणाले की, मंत्रालयाने हे पाऊल उचलल्यामुळे याचा लाभ देशभरातील जवळपास 14 कोटी ज्येष्ठ नागरिक आणि 2.2 कोटी दिव्यांगजनांना होऊ शकणार आहे. (Near to Home: senior citizens,disabled will get vaccine at vaccination centers near their homes) सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने यापूर्वीच आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडे चाचणी, उपचार आणि लसीकरणात दिव्यांग व्यक्तींना भेडसावत असलेल्या समस्या मांडल्या होत्या. AIIMS, दिल्ली येथील ज्येष्ठांसाठी असलेल्या कक्षाशी सल्लामसलत करून मंत्रालयाने 27 एप्रिल 2021 रोजी कोविड प्रतिबंधक वर्तनाचा अंगिकार करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या.

कटारिया म्हणाले की, मोदी सरकार लोकांच्या गरजाबाबत अतिशय संवेदनशील आहे आणि सध्या सुरू असलेल्या साथीच्या परिस्थितीत तातडीने आराम मिळवून देण्यासाठी अथक प्रयत्न करीत आहेत. त्यांनी पुढे माहिती दिली की, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय हे समाजातील दुर्बल घटक आणि इतर असुरक्षित गटांप्रती वचनबद्ध आहे. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने तृतीयपंथीय लोकांना मानसिक आधार देण्यासाठी एक हेल्पलाइन क्रमांक सुरू केला आहे. आजूबाजूच्या परिस्थितीमुळे उद्भवणाऱ्या आणि अनिश्चित वातावरणामुळे मोठ्या प्रमाणावर ताणाला सामोरे जात असलेल्या तृतीयपंथीयांसाठी तज्ञ मानसशास्त्रज्ञांच्या माध्यमातून समुपदेशन सेवा उपलब्ध आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!