जिल्ह्यासह‌ शहरात ‘एन्काऊंटर’ची गरज ! नगरात पुन्हा खूनी हल्ला

जिल्ह्यासह‌ शहरात ‘एन्काऊंटर’ ची गरज ! नगरात पुन्हा खूनी हल्ला
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : शहरात पुन्हा गुलमोहर रोडवरील किर्लोस्कर काॅलनीत दोन अज्ञातांनी बन्सी महाराज मिठाईवालाचे संचालक धीरज जोशी‌ यांच्यावर शनिवारी (दि.१०) सायंकाळी १० वाजण्याच्या सुमारास खूनी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात जोशी हे गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी एक तलवार, गावठी पिस्तूल आढळून आले आहे. घटनेची माहिती मिळताच तात्काळ तोफखाना पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.‌ तसेच या घटनेची माहिती समजताच आमदार संग्रामभैया जगताप हेही घटनास्थळी दाखल झाले.
अहमदनगर शहरासह जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आहे. मागील घटना पाहता जिल्ह्यात खून, हापमार्डर यासह छोट्या मोठ्या गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आता पोलिस प्रशासनाने गुन्हेगारांवर एन्काऊंटर चा प्रयोग करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,300SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!