संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर ः विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मतदान नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १४ हजार ५२६ मतदारांनी नोंदणी केली आहे. सर्वाधिक नोंदणी संगमनेर तालुक्यातून झाली आहे. सर्वात कमी राहुरी तालुक्यात झाली आहे.
नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी दर सहा वर्षांनी पदवीधरांना नाव नोंदणी करावी लागते. निवडणूक आयोगाच्या निर्दशानानुसार ता. १ ऑक्टोंबरपासून नाव नोंदणीस सुरूवात झाली आहे. तलाठी, मंडलाधिकारी आणि तहसील कार्यालयात विहित नमुन्यातील फॉर्म भरून देण्याची सुविधा आहे. त्यानंतर ऑनलाईन नाव नोंदणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यानंतर नाव नोंदणीस प्रतिसाद वाढला आहे. सर्वाधिक नाव नोंदणी संगमनेर तालुक्यात सर्वाधिक ३ हजार १९१ मतदारांची नोंदणी झाली आहे. सर्वात कमी राहुरी तालुक्यात अवघी ३३२ मतदारांची नोंद झाली आहे.
तालुकानिहाय मतदार नोंदणी याप्रमाणे ः अकोले १ हजार ११६, संगमनेर ३ हजार १९१, राहाता ७३०, कोपरगाव ५९८, श्रीरामपूर ८५४, राहुरी ३३२, नेवासे १ हजार ३६५, नगर १ हजार ७४३, शेवगाव ८१५, पाथर्डी ५२४, पारनेर ६८७, श्रीगोंदे १ हजार १२८, कर्जत ८२८, जामखेड ६१५.