संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर – अहमदनगर शहर, राहुरी, लोणी व संगमनेर येथील महिलांचे गळयातील सोन्याचे दागिने बळजबरीने ओढून चोरी करणारे आंतरराज्य सराईत आरोपींची टोळी पकडली. या टोळीकडून २ लाख ७५ हजार रु.किचे ५.५ तोळे (५५ ग्रॅम) वजनाचे दागिने हस्तगत करण्याची मोठी कारवाई अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे.
भु-या ऊर्फ आयुब फैयाज इराणी ( वय५०, रा. इराणी गल्ली, वॉर्ड नं.1, श्रीरामपूर), कंबर रहिम मिर्झा अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, श्रीरामपूर अपर पोलीस अधिक्षक स्वाती भोर मॅडम, शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, संगमनेर उपविभाग पोलिस अधिकारी राहुल मदने व श्रीरामपूर उपविभाग पोलिस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके यांनी दिलेल्या सूचनेनुसार सफौ भाऊसाहेब काळे, पोहेकॉ विजयकुमार वेठेकर, बबन मखरे, देवेंद्र शेलार, पोना शंकर चौधरी, ज्ञानेश्वर शिंदे, संदीप दरदंले, रवि सोनटक्के, दिपक शिंदे, पोकॉ आकाश काळे, मेघराज कोल्हे, चापोहेकॉ उमाकांत गावडे व चापोना भरत बुधवंत आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके यांना जिल्ह्यातील उघड चैन स्नॅचिंगचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगांराची माहिती काढून कारवाई करुन गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या.
आदेशान्वये पोनि श्री. कटके यांनी स्थागुशा पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याच्या सुचना दिल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींची माहिती व शोध घेत असतांना पोनि श्री कटके यांना माहिती मिळाली की, कंबर मिर्झा, श्रीरामपूर याने त्याचे साथीदारांसह चैन स्नॅचिंग करुन चोरलेले सोन्याचे दागिने श्रीरामपूर येथे श्रीरामपूर पुणतांबा जाणारे रोडवरील हॉटेल मिरावली येथे विक्री करण्यासाठी येणार आहे. अशी खात्रीशिर माहिती मिळाल्याने पोनि श्री कटके यांनी खात्री करुन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. सुचनाप्रमाणे स्थागुशा पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी श्रीरामपूर येथे जाऊन हॉटेल मिरावली, श्रीरामपूर परिसरात सापळा लावून थांबले. थोडाच वेळात त्या ठिकाणी मिळालेल्या माहितीतील वर्णना प्रमाणे एकजण संशयीत हालचाली करतांना पथकास दिसला. त्याला पथकाने त्यास ताब्यात घेऊन पोलीस असल्याची ओळख सांगून त्यास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव कंबर रहिम मिर्झा (वय ३५, रा. वॉर्ड नं. १, श्रीरामपूर) असे असल्याचे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात एका काळे रंगाचे कापडी पिशवीत सोन्याचे दागिने मिळून आले. त्याबाबत त्यास विचारपुस करता सुरुवातीस त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यास अधिक विश्वासात घेवुन विचारपुस करता त्याने त्याचा साथीदार आयुब इराणी (रा. श्रीरामपूर) याच्यासोबत अहमदनगर, राहुरी, लोणी, व संगमनेर येथून तेेथील महिलांचे गळयातील सोन्याचे दागिने ओढून चोरुन आणले असुन ते दागिने मोडीसाठी घेऊन जात असल्याचे सांगितले.
आरोपीने दिलेल्या कबुली अनुषंगाने अहमदनगर जिल्हा गुन्हे अभिलेख तपासले असता खालील प्रमाणे एकुण ४ गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झालेले आहेत. तोफखाना, राहुरी , संगमनेर शहर, लोणी पोलिस ठाण्यात गुन्ह्यात चोरी गेलेले एकुण ५५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे २ लाख ७५ हजार रु.किं.चे दागिने आरोपी कंबर रहिम मिर्झा याच्या ताब्यात मिळून आल्याने त्याला लोणी पोलिस ठाण्यात गुन्ह्यात पुढील कार्यवाहीसाठी रिपोर्टाने लोणी पोलिसांच्या ताब्यात दिले.
तसेच त्याचा साथीदाराचा त्याचे राहते घरी जाऊन शोध घेतला असता तो मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव भु-या ऊर्फ आयुब फैयाज इराणी असे असल्याचे सांगितले. त्यांच्याकडे दाखल गुन्ह्यांबाबत विचारपुस करता त्याने आरोपी कंबर मिर्झा याच्यासोबत गुन्हे केल्याची कबुली दिल्याने त्याला लोणी पोलिस ठाण्यात हजर केले आहे. पुढील तपास लोणी पोलिस करीत आहे. कंबर रहिम मिर्झा याच्याविरुध्द विविध पोलीस ठाण्यात दरोडा तयारी, जबरी चोरी, चोरी व फसवणुक असे गंभीर स्वरुपाचे एकुण ३५ गुन्हे दाखल आहेत.