संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर– राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग तसेच ना.जितेंद्र आव्हाड युवा मंच महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जिल्हाधिकारी अहमदनगर यांना ना.जितेंद्र आव्हाड यांच्यावर राजकीय सूडबुद्धीने जे काही खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम झाले त्याचा निषेध आणि ना. जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या वर गुन्हा दाखल करणाऱ्या महिलेची चौकशी करून कोणाच्या दबावाने गुन्हा दाखल करण्यात आला याची चौकशी करून कारवाई करावी, अन्यथा राज्यभर आंदोलन सुरू करण्यात येईल असे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे, महिला जिल्हाध्यक्षा गौतमी भिंगारदिवे , महिला जिल्हा उपाध्यक्षा राधाताई पाटोळे , जिल्हा सरचिटणीस आरतीताई शेलार, जिल्हा कार्याध्यक्ष रशीद भाई शेख, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब ढवळे, तालुका कार्याध्यक्ष शेखरभाऊ पंचमुख, तालुका सरचिणीस संग्राम गायकवाड, राष्ट्रवादीचे व आदिवासी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राम भाऊ चव्हाण,जिल्हा कार्यकारणी सदस्य अल्पसंख्यांक विभागाचे तोफिकभाई पटेल, बंटी भोसले, विजय चव्हाण, सावता चव्हाण, महेश चव्हाण आदी उपस्थित होते.