जालिंदर बोरुडे यांचे आरोग्य क्षेत्रातील योगदान प्रेरणादायी- पो.नि.घन:श्याम डांगे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर – समाजाच्या उन्नत्तीसाठी समाजातील दु:ख कमी करण्यासाठी संत, महात्म्यांनी आपले आयुष्य वेचले. त्यांच्या विचारावर आज अनेक संस्था काम करत आहेत. रमाई बहुउद्देशिय संस्थाही असेच कार्य करत आहेत. त्याचबरोबर त्यांनी समाजात चांगले काम करणार्यांच्या कामाचे कौतुक करुन पुरस्कार रुपी प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. आदर्श समाजसेवक पुरस्कारप्राप्त जालिंदर बोरुडे यांचे सामाजिक, आरोग्य क्षेत्रातील योगदान हे सर्वांसाठी प्रेरणादायी असेच आहे, या पुरस्कार रुपाने त्यांना प्रोत्साहित करण्याचा संस्थेचा प्रयत्न कौतुकास्पद असाच आहे, असे प्रतिपादन राहुरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक घन:श्याम डांगे यांनी केले.
राहुरी येथील रमाई बहुउद्देशय संस्थेच्यावतीने सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे यांना ‘आदर्श समाजसेवक पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी पोलिस निरिक्षक श्री.डांगे, तहसिलदार फियोजिद्दीन शेख, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे सचिव प्रविण मोरे, संस्थेच्या अध्यक्षा सौ.स्नेहलताई सांगळे, उपाध्यक्ष दत्तात्रय गडाख आदि उपस्थित होते.
याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्ष स्नेहलताई सांगळे म्हणाल्या, रमाई संस्थेच्या माध्यमातून महिलांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असतात, त्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचबरोबर समाजात चांगले काम करुन आपल्या कार्याने समाजोद्धाराचे काम करणार्यांचा सन्मान करुन त्यांच्या कार्यास प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न पुरस्काराच्या माध्यमातून केला आहे. फिनिक्स फौंडेशनच्या माध्यमातून जालिंदर बोरुडे यांनी मोतीबिंदू, नेत्रदान, अवयव दान, आरोग्य शिबीरच्या माध्यमातून अनेकांना दिलासा देण्याचे काम केले आहे. गरजूंचे मोठे आशिर्वाद त्यांना मिळत आहेत. त्यांच्या या निस्वार्थ कार्यास पुरस्कार रुपाने सन्मानित केले असल्याचे सांगितले.
यावेळी जालिंदर बोरुडे म्हणाले, महाग होत चालेली आरोग्य सेवा गरजूंना मोफत मिळावेत, त्यांच्या जीवनातील अंधकार दुर व्हावा, यासाठी फिनिक्स फौंडेशनच्या माध्यमातून कार्य सुरु आहे. गोर-गरीबांचा याचा मोठा फायदा होत असल्याचे समाधान आहे. आजच्या पुरस्काराने आपल्या कार्यास प्रोत्साहन मिळणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी उपाध्यक्ष दत्तात्रय गडाख यांनी रमाई संस्थेच्या कार्याचा आढावा सादर करुन सर्वांचे आभार मानले.