संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : शहरातील तपोवनरोड येथे विक्री करण्याचे उद्देशाने ३ गावठी कट्टे व २ जिवंत काडतुस जवळ बाळगणार-या दोघांना पकडून त्याच्याकडून ९० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई मावळते अहमदनगर एलसीबी पोनि अनिल कटके यांच्या एलसीबी टिम’ने वंशातर करून केली आहे.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे व नगर शहर डिवायएसपी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मावळते अहमदनगर एलसीबी पोनि अनिल कटके यांच्या सूचनेनुसार एलसीबीचे सपोनि गणेश वारुळे, सफौ राजेंद्र वाघ, सफौ संजय खंडागळे, पोहेकॉ सुनिल चव्हाण, संदीप पवार, दत्तात्रय हिंगडे, बापु फोलाणे, संदीप घोडके, पोना शंकर चौधरी, विशाल दळवी, भिमराज खर्से, पोकॉ विनोद मासाळकर, योगेश सातपुते, चापोहेकॉ संभाजी कोतकर आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली आहे.
आदेशाप्रमाणे एलसीबी टिम’ने वेशांतर करुन मिळालेल्या माहितीनुसार तपोवन रोड येथे जाऊन सापळा लावला, या दरम्यान थांबलेले असताना ३ संशयीत पायी येतांना दिसले. एलसीबी टिम’ची खात्री होताच पथकाने दोघा संशयीतांना ताब्यात घेतले. त्यातील एक पळून गेला. ताब्यात घेतलेल्या दोघांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची सागर एकनाथ आवसरे (वय २६, रा. गाडेकर चौक, पत्राचाळ, निर्मलनगर, अहमदनगर), मनोज लक्ष्मण झगरे, (वय ३१, रा. गुंडू गोडावुन मागे, तपोवनरोड, अहमदनगर) असे असल्याचे सांगितले. त्याची पंचासमक्ष अंगझडती घेता त्यांचे अंगझडतीत ३ गावठी बनावटीचे कट्टे व २ जिवंत काडतूस मिळून आल्याने जप्त करण्यात आली. पळून गेलेल्याचा शोध घेतला परंतु तो मिळून आला नाही. एलसीबी टिम’ने पकडण्यात आलेल्यांकडे गावठीकट्टे व काडतुसाबाबत विचारपुस करता सुरुवातीस तो समाधानकारक उत्तरे न देता उडवा उडवीची उत्तरे देऊ लागले. गावठीकट्टे व जिवंत काडतुस विक्री करण्याचे उद्देशाने आणले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.