संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
काष्टी : जागेवर ८ पतसंस्था व एका बँकेचा २० लाखांचा कर्जाचा बोजा आहे. तरीही शहानिशा नकरता श्रीगोंदा दुय्यम निबंधकांने बोगस खरेदी- खत केल्याची घटना घडली आहे. याबाबत चौकशी करावी, अशी मागणीही संबंधितांनी केली आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील शिक्षक कॉलनी परिसरातील पालकांच्या नावावरील जागा वनीता देवीदास परहर यांनी साडेसात गुंठे जागा राजेंद्र जगन्नाथ सोनवणे यांना बेकायदेशीर विकली आहे. या जागेवर आठ पतसंस्थाचा व एका बँकेचा २० लाखांचा कर्जाचा बोजा असून, श्रीगोंदा येथील दुय्यम निबंधकांनी बोगस खरेदी- खत कसे करून दिले. याची चौकशी होऊन संबंधित खरेदीखत रद्द व्हावे, म्हणून सिताबाई शंकर परहर यांनी श्रीगोंदा तहसीलदारांकडे हरकती घेऊन दुय्यम निबंधकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

शिक्षक कॉलनीतील गट नंबर ह्या मध्ये गट नंबर ३१, ३२, ५७४, व ५८५ मध्ये एकूण १२ गुंठे सामायिक जागा . परंतु, ३ जुलै २०१९ रोज देवीदास शंकर परहर या हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्यानंतर साडेसात गुंठे जागा मयत देवीदास यांच्या आई सीताबाई परहर, सोमनाथ परहर, कार्तिकी परहर व पत्नी वनिता परहर यांना वारसाने मिळाला.