संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर- १९ नोव्हेंबर जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत जिल्हयातील सर्व गावात हागणदारीमुक्त सातत्य ठेवण्याकरिता तसेच वैयक्तिक शौचालयाचा वापर होणे, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सन २०२२-२३ अंतर्गत विहित कालमर्यादेत कार्यवाही करणे यासाठी दि. ३ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर, २०२२ या कालावधीत विशेष मोहिम राबविण्यात येत असल्याची माहिती अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी दिली.
जिल्हयातील स्वच्छतेच्या कामास गती देऊन स्वच्छतेचा जागर करावयाचा असून जागतिक शौचालय दिनाच्या निमित्ताने, स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत गावस्तरावर स्वच्छतेच्या विविध उद्दिष्ठांच्या पूर्तीकरिता सूक्ष्म नियोजन करुन कामे पूर्ण केली जाणार आहेत.
या मोहीम कालावधीत यापूर्वी मंजूर केलेले वैयक्तिक, सार्वजनिक शौचालय संकुलाचे बांधकाम, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, गोबरधन प्रकल्प, प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प, शोषखड्डे बांधकाम, नादुरुस्त शौचालय दुरूस्ती करणे, मैला गाळ व्यवस्थापन अशा प्रकारे सुरू असणारी ही सर्व कामे पुर्ण केली जाणार असल्याची माहिती आशिष येरेकर यांनी दिली.विशेष स्वच्छता मोहीम कालावधीत ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग घेऊन सार्वजानिक ठिकाणची स्वच्छता तसेच एक शोषखड्डे असलेली शौचालय दोन शोषखड्डे शौचालयात रुपांतर केली जाणार आहे. याबाबत सर्व अधिकारी,कर्मचारी यांना नियोजपूर्वक कामे करुन मोहीम राबविन्याचा सूचना अहमदनगर जिल्हा परिषदेचे पाणी व स्वच्छ्ता उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे यांनी दिली.