
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर. दि.२२ मार्च २०२३ रोजी जागतिक जलदिनानिमीत्त ग्रामसभेची बैठक घेऊन ग्रामपंचायतीने त्यांच्या पाणी आणि स्वच्छता स्थितीचा विचार करून (HGJ) हर घर जल किंवा (ODF +) खुले शौचमुक्त दर्जा प्राप्त केलाबाबतचा, ठराव पास करण्यात येणार आहे. जिल्हयातील ग्रामपंचायतीमध्ये हर घर जल व ओडीएफ प्लस बाबतचे ठराव २२ मार्च जलदिनाचे औचित्य साधुन घेण्यात येणार आहेत, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आशिष येरे कर यांनी सांगितले.

खुले शौचमुक्त (ODF) भारत हा असाधारण मैलाचा दगड पुढे नेत, संपुर्ण ग्रामीण स्वच्छता शास्वत टिकवण्याच्या अनुषंगाने स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा २ अंर्तगत ग्रामीण लोकाचा सहभाग व जनजागृती करून ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना वैयक्तीक शौचालयाची उपलब्धता करून देणे तसेच आवश्यकतेनुसार सार्वजनिक शौचालय बांधकाम, घनकचरा व्यवस्थापन व सांडपाणी व्यवस्थापन गोबरधन मैला गाळ व्यवस्थापन, प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन याबाबींच्या अनुषंगाने कार्यवाही करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने कार्यवाही करून ज्या गावांनी घन कचरा किंवा द्रव कचरा सांडपाणी व्यवस्थापन पूर्ण केले आहे, त्यांनी त्यांच्या ग्रामसभेत स्वतःला ODF घोषित करणारा ठराव पास करावा. त्याचप्रमाणे, जल जीवन मिशनच्या निकषानुसार गावातील सर्व घरांना कार्यात्मक घरगुती नळ जोडणी (FHTC) तसेच शाळा आणि अंगणवाडी सार्वजनिक संस्थांना कार्यात्मक नळ जोडणी देणे आवश्यक आहे. त्यांनतर अशी गावे हर घर जल म्हणुन घोषित करणेत येणार आहे. त्यानुसार ज्या गावांनी जल जीवन मिशनचे निकष विचारात घेऊन गावातील सर्व घरांना कार्यात्मक घरगुती नळ जोडणी (FHTC) तसेच शाळा आणि अंगणवाडी सार्वजनिक संस्थांना कार्यात्मक नळ जोडणीव्दारे पाणी पुरवठा सुरु केला आहे अशा ग्रामपंचायतींनी ग्राम सभा घेऊन तसा ठराव पारित करणेत येणार आहे.
दि. २२ मार्च हा दिवस सर्वत्र जागतिक जल दिन म्हणुन साजरा करण्यात येत असतो. यानिमित्ताने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार दि १६ मार्च ते २२ मार्च दरम्यान जिल्हयात जल जागृती सप्ताहाचे आयोजन करावयाचे आहे. या कालावधीत ग्रामपंचायतस्तरावर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
यावेळी जागतिक जल दिन सप्ताहाचे उदघाटन करुन जलपूजन करणे, जल प्रतिज्ञा घेणेत येणार आहे.
तसेच FTK किट व्दारे सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची तपासणी दि. २२ मार्च २०२३ रोजी सर्व ग्रामपंचायतीमध्ये एकाच दिवशी FIK किट व्दारे सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची तपासणी करणे. याकरीता जलसुरक्षक आणि गावनिहाय प्रशिक्षीत ५ महिलांची मदत घेणेत येणार आहे. स्त्रोत व साठवण टाकी सफाई मोहिम पाण्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पाणी साठवण टाक्याची साफ-सफाई करणेत येणार आहे. सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची स्रोत परिसर स्वच्छता तसेच पिण्याच्या पाण्याची टाकीची स्वच्छता मोहिमेदरम्यान करण्यात येणार आहे. शुन्य गळती व तोटी बसवा मोहिम. नळ पाणी पुरवठा योजनांमध्ये अनेक ठिकाणी गळती असल्यामुळे पाणी पुरवठा कमी प्रमाणात होतो. परीणामी वीज बिल सुध्दा जास्त भरावे लागते. या करीता सर्व ग्रामपंचायतमधील पाणी पुरवठा योजना गळती असल्यास तो दुरुस्त करण्याकरिता मोहिम राबविण्यात येणार आहे. याचाच एक भाग म्हणून नळाना तोटी बसवा मोहिम राबविण्यात येणार आहे.
लोकवर्गणी मोहिम राबवुन हर घर नल से जल अभियान अंतर्गत लाभार्थ्यांना नळ जोडणीस प्रवृत्त करणेत येणार आहे.आणि योजनेच्या भविष्यातील देखभाल व दुरुस्तीकरीता लोकवर्गणी जमा करण्यासाठी गृहभेटी घेणेत येणार आहे. गृहभेटी दरम्यान घरगुती पिण्याच्या पाण्याची साठवण, हाताळणी, पाणी अशुध्द होण्याची कारणे याबाबत माहिती ग्रामस्थाना देणेत येणार आहे. जनजागृतीपर रॅली ग्रामपंचायत स्तरावर विद्यार्थी, महिला बचत गट व ग्रामस्थ यांना घेऊन पाणी बचत, घरोघरी नळ जोडणी, पाणी पटटी वसुलीसाठी जनजागृतीपर रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे.
तसेच गावस्तरावर म्हणी रंगविणेत येणार आहेत. पाणी बचत, शुध्द पिण्याचे पाणी, हात धुण्याची योग्य पध्दत आदिबाबत ग्रामपंचायत स्तरावर ५ म्हणी रंगविणेत येणार आहेत. या सर्व उपक्रमात जास्तीत नागरीकांनी सहभागी व्हावे असे आवाहन सुरेश शिंदे प्रकल्प संचालक जल जीवन मिशन यांनी केले.