संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर – रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलुलकर यांना समाज महर्षी पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले. भाऊसाहेब जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास दादासाहेब गावडे, शिवाजी भापकर, परमेश्वर उमरदंड, साहेबराव पवळे आदि उपस्थित होते. राष्ट्रसेवा परिषद संचलित मराठबोली या पुण्यातील संस्थेच्या अठराव्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना पुणे येथे समारंभात सन्मान प्रदान करून गौरविण्यात आले.
जयंत येलुलकर यांनी सांस्कृतिक क्षेत्रात केलेले कार्य प्रेरणादायी असून त्यांच्या नेतृत्वाखाली नगरमध्ये साजरा होणारा रसिक ग्रुपचा गुढी पाडवा सांस्कृतिक महोत्सव हा राज्यात प्रसिद्ध असून याद्वारे त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या शहराचे नाव सांस्कृतिक क्षेत्रात सर्वदूर नेले आहे.
ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे, असे संयोजक परमेश्वर उमरदंड यांनी सांगितले.
साहित्य, क्रीडा, पर्यटन औद्योगिक क्षेत्रात – त्यांनी मनापासून दिलेले आपले योगदान मोलाचे असून पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीमध्ये श्री. येलुलकर यांच्या योगदाना बद्दल त्यांचा बी.सी.सी.आय चे तत्कालीन अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते त्यांचा खास गौरव करण्यात आला होता. आपल्या शहरावर मनापासून प्रेम करणाऱ्या येलुलकर यांनी ऐतिहासिक शहराच्या पर्यटनावृद्धी साठी केलेले उपक्रम तरुणाई पुढे आदर्श उदाहरण आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन संस्थेने त्यांना सन्मानीत केले आहे, असे परमेश्वर उमरदंड यांनी सांगितले. प्रास्ताविक सचिन कुरकुटे यांनी केले. योगिता पाखले यांनी आभार मानले.