संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर ः शेतवस्तीवरील घराचा दरवाजा उचकटून जबरी चोरी करणारे दोन चोरट्यांना पकडून त्याच्याकडून 2 लाख 40 हजार रुपये किंमतीचे मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई अहमदनगर एलसीबी टिमने केली आहे. अनिकेत विलास हुलावळे (वय 19, रा. गाड्याचा झाप, पळशी, ता. पारनेर), गणमाळ्या संदल चव्हाण (रा. वासुंदे, ता. पारनेर) अशा दोघांंना ताब्यात घेतले आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या आदेशानुसार एलसीबी पोनि दिनेश आहेर यांच्या सूचनेनुसार एलसीबीचे पोसई सोपान गोरे, सफौ भाऊसाहेब काळे, पोहेकॉ दत्तात्रय हिंगडे, मनोहर गोसावी, बापुसाहेब फोलाणे, अतुल लोटके, देवेंद्र शेलार, पोना/रविंद्र कर्डीले, गणेश भिंगारदे, संतोष खैरे, पोकॉ मच्छिद्र बडे, आकाश काळे, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, चापोहेकॉ उमाकांत गावडे व चापोकॉ अरुण मोरे आदिंच्या टिमने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, घराचे पडवीत झोपलेले असताना अनोळखी 4 इसमांनी लोखंडी सळईने ग्रिलचा दरवाजा उचकटून आत प्रवेश करुन, सळईने मारहाण करुन घरातील 2 लाख 10 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने, मोबाईल फोन व रोख रक्कम बळजबरीने चोरुन घेवुन गेले बाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी वरुन पारनेर पोलीस स्टेशन गु.र.नं. 1081/2023 भादविक 394, 342, 34 प्रमाणे प्रभाकर आण्णा गागरे (रा. पळशी, ता. पारनेर) यांच्या फिर्यादीवरून दि. 17 नोव्हेेंबर2023 रोजी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
एलसीबी टिमने रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेताना पोनि श्री आहेर यांना दि.24 नोव्हेेंबरला माहिती मिळाली की, गुन्हा हा इसम अनिकेत हुलावळे (रा. पळशी, ता. पारनेर) याने त्याचे इतर साथीदारासह केला. तो टाकळी टोकेश्वर (ता. पारनेर) येथे आला आहे. आता गेल्यास मिळून येईल, अशी खात्रीशीर माहिती मिळाली. पोनि श्री. आहेर यांनी प्राप्त माहिती एलसीबी टिमला देऊन खात्री करुन कारवाई करण्याचे सांगितले.पथकाने लागलीच त्या ठिकाणी जाऊन माहितीप्रमाणे संशयीताचा शोध घेता तो मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले. त्याने त्याचे अनिकेत विलास हुलावळे (रा. गाड्याचा झाप, पळशी, ता. पारनेर) असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपुस करता त्याने त्याचे इतर साथीदार कबीर ऊर्फ कब-या काळे (फरार), अक्षय काळे (फरार) (दोन्ही रा. सुरेगांव, ता. श्रीगोंदा), साईनाथ जाधव (रा. घोसपुरी, ता. नगर (फरार) व गणमाळ्या संदल चव्हाण (रा. वासुंदे, ता. पारनेर) अशांनी मिळून गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपींचे इतर साथीदारांचा शोध घेता आरोपी गणमाळ्या संदल चव्हाण (रा. वासुंदे, ता. पारनेर) तो मिळून आल्याने त्यास देखील ताब्यात घेतले.