जबरी चोरीतील चोरटे पकडले ; अहमदनगर एलसीबीची कारवाई

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork (व्हिडिओ)
अहमदनगर-
श्रीरामपूर तालुक्यातील कारेगांव व अशोकनगर व नगर तालुका येथील शेतावरील वस्तीवर जाऊन घरात प्रवेश व गंभीर दुखापत करुन जबरी चोरी करणारी सराईत आरोपींची आंतरजिल्हा टोळी पकडली आहे. या टैळीकडून ९ लाख ७५ हजार रु.किंचे ११.५ तोळे (११५ ग्रॅम) व एक तवेरा गाडीसह मुद्देमाल जप्त करण्याची मोठी कारवाई अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर मॅडम, श्रीरामपूर उपविभाग पोलिस अधिकारी संदीप मिटके व नगर ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि दिनकर मुंडे, पोसई सोपान गोरे, पोसई विठ्ठल पवार, पोसई संदीप ढाकणे, पोसई विजय भोंबे, सफौ मनोहर शेजवळ, पोहेकॉ सुनिल चव्हाण, बबन मखरे, दत्ता हिंगडे, संदीप पवार, बापुसाहेब फोलाणे, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, विश्वास बेरड, पोना शंकर चौधरी, संदीप दरंदले, ज्ञानेश्वर शिंदे, संदीप चव्हाण, भिमराज खर्से, रवि सोनटक्के, दिपक शिंदे, पोकॉ विनोद मासाळकर, जालिंदर माने, सागर ससाणे, विजय धनेधर, रविंद्र घुंगासे, योगेश सातपुते, मेघराज कोल्हे, मपोना भाग्यश्री भिटे, मपोकॉ ज्योती शिंदे, सारीका दरेकर, चापोहेकॉ उमाकांत गावडे, बबन बेरड, संभाजी कोतकर व भरत बुधवंत आदिंच्या पथकाने ही कारवाई केली.

याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.४ नोव्हेंबरला रात्रीचे जेवण करुन दरवाजा खिडक्या बंद करुन कुटूंबियासह झोपलेले असतांना अनोळखी जणांनी घराचे किचनचे दरवाजाची कडीकोंडा कटावणीच्या सहाय्याने तोडून घरात प्रवेश करुन, चाकुचा धाक दाखवून साक्षीदारांना कटावणी व लाथाबुक्यांनी मारहाण व जखमी केले. घरातील सामानाची उचका पाचक करुन २ लाख ७१ हजार रु.किंमतीचे सोन्याचे दागिने घेऊन गेले आहे. तसेच जातांना गावातील सचिन अरुण जगताप याचे बंद घराचा दरवाजा तोडून कपाटातील १० हजार रु. रोख रक्कम असा एकूण २ लाख ८१ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल बळजबरीने चोरुन नेला आहे, या निखील बाळासाहेब वाघ ( रा. वाघवस्ती, चारी क्र.११, कारेगांव, ता. श्रीरामपूर) यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन गु.र.नं. ४२६/२०२२ भादविक ३९४,३८०,४५७ प्रमाणे आरोपीविरुध्द जबरी चोरी घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके यांना गुन्हा उघडकिस आणणे करीता विशेष पथक नेमून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. आदेशाप्रमाणे पोनि श्री. कटके, यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करून गुन्ह्यांतील आरोपींची माहिती व शोध घेणे बाबतच्या सूचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.
स्थागुशा विशेष पथक श्रीरामपूर, नेवासा परिसरात फिरुन आरोपींची माहिती घेत असतांना पोनि श्री. कटके यांना माहिती मिळाली की, काही संशयीत इसम तवेरा गाडीमधून चोरीचे सोने विक्री करण्यासाठी औरंगाबादकडून अहमदनगरकडे येणार आहेत. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि श्री. कटके यांनी ती माहिती पथकाला देऊन संशयीतांची खात्री करुन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. सुचनाप्रमाणे स्थागुशा पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी खडका फाटा, ता. नेवासा येथे जाऊन आजुबाजूला दबा धरुन, सापळा लावुन थांबलेले असतांना बातमीतील वर्णना प्रमाणे एक तवेरा गाडी येताना दिसली. पथकाची खात्री होताच गाडीस आडवे होऊन थांबण्याचा इशारा केला. यावेळी संशयीतांनी वाहनाचा वेग कमी करताच वाहनामध्ये बसलेल्यांनी तवेरा गाडीचा दरवाजा उघडून पळून जाऊ लागले. पथकाने त्यांचा पाठलाग केला परंतु ते मिळून आले नाही. त्यावेळी पथकातील इतर अंमलदारांनी थांबलेल्या वाहनातील तिघांना जागीच पकडून पोलीस असल्याची ओळख सांगुन त्यांना त्याचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे आर्यन ऊर्फ एरीयल ऊर्फ काळु कांतीलाल काळे (वय २६, रा. नवापुरवाडी, ता. गंगापुर, जि. औरंगाबाद), विदेश नागदा भोसले (वय १९ , रा. नवापुरवाडी, ता. गंगापुर, जि. औरंगाबाद), भोईट्या ऊर्फ डसल्या ऊर्फ आदित्य कांतीलाल काळे (वय २१, रा. मानगल्ली, नेवासा फाटा, ता. नेवासा) असे असल्याचे सांगितले. त्याच्याकडे अहमदनगरमध्ये येण्याचे कारण विचारले असता सुरुवातीस ते उडवा उडवीची उत्तरे देऊ लागले. त्यावेळी ताब्यातील तवेरा गाडीची झडती घेता गाडीचे ड्राव्हरमध्ये एक कापडी पिशवी मिळुन आली त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सोन्याचे दागिने मिळाले. मिळून आलेल्या दागिन्याबाबत अधिक विश्वासात घेऊन विचारपुस करता त्यांनी श्रीरामपूर व नगर तालुका परिसरात घरात घुसून मारहाण करुन चोरी केलेले सोने विक्री करण्यासाठी जात असल्याचे कबुल केले.आरोपीने दिलेल्या कबुली अनुषंगाने अहमदनगर जिल्हा गुन्हे अभिलेख तपासले असता खालील प्रमाणे ४ गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झालेले आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!