जगातील पहिली शिवजयंती साजरी करणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुलेंना शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला भिंगारमध्ये अभिवादन

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर –
भिंगार येथे संभाजी ब्रिगेड व इतर समविचारी सामाजिक संघटनांकडून भिंगार अर्बन बँक येथील महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तसेच दिवे पेटवून शनिवारी (दि.१८) पूर्वसंध्येला अभिवादन करण्यात आले.


म.फुलेंनी १८८० साली रायगडावर झाडाझुडुपांमध्ये हरवलेली शिवसमाधी शोधून काढत त्यावर फुले वाहून जगातील पहिली शिवजयंती साजरी केली. या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून शिवजयंतीच्या पुर्वसंध्येला म.फुलेंना भिंगारमध्ये अभिवादन करण्यात आले.
प्रसंगी भिंगार अर्बन बँकेचे चेअरमन अनिलराव झोडगे, संचालक अमोल धाडगे, संभाजी ब्रिगेडचे अच्युत गाडे, कैलास वाघस्कर, राजेंद्र कडूस, देवांग कोष्टी समाजाचे शिवम भंडारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे मतीन सय्यद, सिध्दार्थ आढाव, मानस प्रतिष्ठानचे विशाल बेलपवार, लहुसंग्राम प्रतिष्ठानचे सागर गायकवाड, बहुजन एकता मंचचे विकास चव्हाण, प्रताप शिंदे, जालु बनसोडे, भैय्या लाळगे इ.उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!