जगातील चिमणी दिवस रद्द करा! पक्षी संशोधक सूर्यकांत खंदारे

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork

गेल्या शतकात सतत कमी होणारी पक्षी संख्या आणि विलुप्तीच्या मार्गांवरील अचानक गायब झालेली चिमणी या विषयी जनजागृती करण्यासाठी गेल्या 14 वर्षा पासून 20 मार्च ला जागतिक चिमणी दिवस साजरा करण्यात येतो.हा जागतिक चिमणी दिवस तात्काळ बंद करण्याची मागणी पक्षी संशोधक सूर्यकांत खंदारे काही वर्षा पासून करत आहेत.

या विषयी पक्षी संशोधक पुढे बोलतात चिमण्यांची संख्या घटण्याचे अनेक कारण परंपरागत ज्ञानाच्या आधारावर सांगण्यात येतात जसे कि कमी होणारे जंगल तसेंच वेगाने वाढणारे शहरीकरण, मोबाईल टॉवर त्यातील रेडि्येशन, ध्वनी प्रदूषण, लाईट प्रदूषण, इत्यादी.पक्षी संशोधक खंत व्यक्त करतात कि चिमणी संपत आहे हे दर्शवण्यासाठी चुकुचे निरीक्षण नोंदवले गेले.जसे कि चिमण्याच्या संख्ये विषयी बोलायचे झालेच तर खूप चुकीचे निरीक्षण किंवा अधुरे निरीक्षण नोंदवले गेले आहेत. उदा. लखनउ मध्ये 2015 च्या पक्षी गणनेत 5692 चिमण्याची नोंद घेण्यात आली आणि 775 चिमणी थवे विविध ठिकाणी नोंदणी गेली,2017 मध्ये तिरुअनंतपुरम येथे फक्त 29 चिमण्या नोंदवल्यात, चिमण्यांची संख्या आंध्र प्रदेश मध्ये 80 % तसेच 20 % राजस्थान, गुजरात, केरळ येथे कमी झाली आहे.ही आकडेवारी भारतीय कृषी संशोधन परिषदने नोंदवी आहे.या प्रवृत्ती मुळे पंजाब मध्ये चिमणी विलुप्त होण्याच्या मार्गांवर आहे अशी नोंदणी केली गेली. लाखो जीवित प्रजाती मधील मानव ही एक प्रजाती आहे,विधात्याच्या या जीवनसृष्टी मध्ये माणूस मालक बनू पाहत आहे.काही लोकांची पाशवीप्रवृत्ती निसर्गात जे आहे ते माझ्या प्रयत्नमुळे आहे हे दर्शवाण्यात सार्थकता मानतात.या विषयी पक्षी संशोधक सूर्यकांत खंदारे सांगतात उन्हाळा आला कि चिमान्यांना दाना-पाणी करणाऱ्यांची संख्या अचानक वाढते, पण त्यांच्या याच कृती मुळे मानवी दानापाण्यावर ऐतखाऊ निसर्गासाठी घातक अशा नवीन पक्षी प्रजातीचा उगम होतो आणि अशा पक्षांना त्यांच्या मते आकाशातील उंदीर म्हणणे योग्य असेल.निसर्गातील उत्कृष्ट अभियंता चिमणी आहे जी घरटे कुठल्याही शैक्षणिक पात्रते शिवाय नितांत स्वर्गीय या स्वरूपाचे घरटे बांधते पण काही लोकांना, पक्षांच्या जीवन जगण्याच्या क्षमते वर शंका आहे, त्यामुळेच मानव निर्मित घरटे लावण्याची सुरुवात झाली आहे.पक्षी संशोधक सूर्यकांत खंदारे त्यांच्या संशोधन कार्याबद्दल सांगतात कि जागतिक स्तरावर पक्षी जगत पुर्ण पणे बदले आहे, शेकडो वर्ष पूर्वीची नैसर्गिक जीवनशैली वर आधारित पक्षी संवर्धन भारतात होत आहे, त्यामुळे पक्षी जगतातील झालेल्या बदला विषयी अभ्यास न करता पारंपरिक पद्धतीने पक्षी संवर्धन सुरु आहे आणि त्यामुळे निसर्गाचे संतुलन बिघडतं आहे.भाकडं ज्ञानावर आधारित जागतिक चिमणी दिवस साजरा करणारे स्वयम घोषित पक्षी रखवाले एकमेकांचे कार्य किती महान आहे हे दर्शवण्यासाठी हा दिवस मुख्य उद्देशाने वापरतात.पण पक्षी संशोधन केंद्र यांच्या संशोधनात चिमण्यांची संख्या सुस्थितीत नोंदवली गेली. खरं पाहता कितीही लहान जिल्हा असेल तरी 5 अंकी चिमणी अधिवास किमान आहेत.चिमण्या संपल्या नाहीत तर त्यांनी फक्त अधिवास बदला आहे.चुकीची आकडेवारी दाखवून जागतिक चिमणी दिवस साजरा करण्यात येतो.यात कुठल्याही वैज्ञानिक विचाराने चिमणी संवर्धन केले जात नाही, त्यामुळे जागतिक चिमणी दिवस तात्काळ रद्द करावा या साठी पक्षी संशोधक सूर्यकांत खंदारे पर्यावरण मंत्रालयात सतत पाठपुरावाठा करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!