चैन स्नॅचिंग करणारी सराईत टोळी जेरबंद, १२ गुन्हे उघडकीस आणण्यास यश ; नगर क्राईम ब्रॅंचची कामगिरी

चैन स्नॅचिंग करणारी सराईत टोळी जेरबंद, १२ गुन्हे उघडकीस आणण्यास यश ; नगर क्राईम ब्रॅंचची कामगिरी
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहिल्यानगर : चैन स्नॅचिंग करणाऱ्या ४ जणांच्या सराईत टोळीला पोलिसांनी पकडले असून, १२ गुन्हे उघडकीस आणण्यास यश मिळाले आहे. या कारवाईत ११ लाख ८४ हजार ३२० रुपये रक्कमेची १५ तोळे सोने पकडण्यात आलेल्या टोळी कडून हस्तगत करण्यात आले आहेत. ही महत्त्वपूर्ण कामगिरी अहिल्यानगर क्राईम ब्रॅंच टीमने केली आहे.
एसपी राकेश ओला, श्रीरामपूर अपर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मे, शिर्डी डिवायएसपी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर क्राईम ब्रॅंच पोनि दिनेश आहेर यांनी दिलेल्या सूचनेनुसार पोसई अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार मनोहर गोसावी, गणेश भिंगारदे, फुरकान शेख, बाळासाहेब गुंजाळ, भगवान थोरात, सुनिल मालणकर, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड व अरूण मोरे आदींच्या टीमने ही कारवाई केली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.२० मार्च २०२५ रोजी शिर्डी येथे रस्त्याने पायी जात असताना यातील आरोपी हे दुचाकीवर येऊन त्यांनी गळ्यातील सोन्याची चैन ओढून चैन स्नॅचिंग करून घेऊन गेले, या कुमारीदुर्गा रामप्रभु (रा.कपीलेश्वर नगर, निलंग्रे, चेन्नई, तामीळनाडू) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस ठाण्यात गुरनं ३१२/२०२५ बीएनएस कलम ३०९(४) प्रमाणे चैन स्नॅचिंगचा गुन्हा दाखल आहे.
या घटनेनंतर एसपी राकेश ओला यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात चैन स्नॅचिंगचे गुन्हे ना उघड असल्याने क्राईम ब्रॅंच पोनि दिनेश आहेर यांनी जिल्ह्यातील चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांचा समांतर तपास सुरु केला.
दि.२९ मार्च २०२५ ला क्राईम ब्रॅंच टीमने शिर्डी पोलीस ठाणे हद्दीत चैन स्नॅचिंगच्या गुन्हयांचा सीसीटीव्ही फुटेज व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे तपास करत चैन स्नॅचिंगचा गुन्हा रेकॉर्डवरील आरोपी सोमनाथ मधुकर चौभे व त्याचे साथीदारांनी केलेला असून ते शिर्डी परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरुन क्राईम ब्रॅंच टीमने शिर्डी परिसरात आरोपीचा शोध घेऊन सोमनाथ मधुकर चौभे (वय ३९, रा.अशोकनगर, ता.श्रीरामपूर, जि.अहिल्यानगर), अक्षय हिराचंद त्रिभुवन (वय २३, रा.लाडगाव चौफुली, ता.वैजापूर, जि.छ.संभाजीनगर), अनुप उर्फ चिंग्या गोडाजी चव्हाण(वय ३६, रा.माळीसागज, ता.वैजापूर, जि.छ.संभाजीनगर) व संतोष म्हसु मगर (वय ३६, रा.बेलापूर रोड, गायकरवस्ती, ता.श्रीरामपूर, जि.अहिल्यानगर) अशांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी ताब्यातील आरोपींना विश्वासात घेऊन गुन्ह्यांच्या अनुषंगाने विचारपूस केली असता आरोपी सोमनाथ मधुकर चौभे याने काही दिवसापूर्वी अक्षय हिराचंद त्रिभूवन याच्यासह दुचाकीवर शिर्डी येथे एका महिलेच्या गळयातील सोन्याची चैन ओढून चोरी केली. त्यावेळी चिंग्या गोडाजी चव्हाण व संतोष म्हसु मगर हे दुचाकीवर गुन्हा करण्यास मदत करत असल्याची माहिती दिली. पोलिसांनी ताब्यातील आरोपीकडे त्यांनी आणखी गुन्हे केले आहेत काय, याबाबत सखोल विचारपूस केली. त्यांनी मागील काही महिन्यापासून शिर्डी, संगमनेर, अहिल्यानगर व श्रीरामपूर येथे वेगवेगळ्या ठिकाणी महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याच्या दिलेल्या माहितीवरुन शिर्डी, तोफखाना, संगमनेर शहर व श्रीरामपूर शहर पोलीस ठाणेच्या अभिलेख पडताळणी करून १२ चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,300SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!