शिर्डी डिवायएसपी टिम’ला यश
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
शिर्डी – चैन स्नॅचिंग गुन्ह्यांतील दोघा चोरट्यांना पकडण्यात ‘शिर्डी डिवायएसपी टिम’ला यश आले आहे. विनोद ऊर्फ खंग्या विजय चव्हाण (रा. अशोकनगर, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर), योगेश सिताराम पाटेकर (रा. वडाळा महादेव, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर मॅडम, शिर्डी डिवायएसपी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी डिवायएसपी ऑफिसचे पोहेकॉ इरफान शेख, पोना अशोक शिंदे, पोना कृष्णा कुन्हे आदिंच्या ‘टिम’ने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, राहाता तालुक्यातील लोणी पोलीस ठाणे हद्दीतील लोणी गावात दि. २५ डिसेंबरला रस्त्याने पायी जात असलेल्या महिलेच्या गळयातील सोन्याचे दागिने दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी ओढून चोरुन नेल्याची घटना घडली होती. याबाबत लोणी पोलिस ठाण्यात येथे गुरनं. ६५०/२०२२ भा.द.वि. कलम ३९२,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.या दाखल गुन्ह्यातील चोरट्यांची माहिती काढून आरोपीतांना जेरबंद करण्याबाबत शिर्डी डिवायएसपी टिम’ला तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
या गुन्ह्यातील चोरट्यांची काहीही माहिती नसतांना गुन्ह्यांच्या अनुषंगाने दि. २७ डिसेंबर २०२२ ला माहिती काढत असतांना शिर्डी डिवायएसपी टिम’चे पोह इरफान शेख यांना माहिती मिळाली. गुन्हा हा रेकॉर्डवरील गुन्हेगार विनोद ऊर्फ खंग्या विजय चव्हाण ( रा. अशोकनगर, ता. श्रीरामपुर, जि. अहमदनगर) याने व त्याचे साथीदाराने केला आहे. ही माहिती शिर्डी डिवायएसपी संजय सातव यांना सांगितली. त्या माहितीनुसार शिर्डी डिवायएसपी श्री सातव यांनी ‘शिर्डी डिवायएसपी ऑफिस टिम’ला तपासाच्या सूचना दिल्या.
त्याप्रमाणे शिर्डी डिवायएसपी टिम’ने कोळपेवाडी (ता. कोपरगांव) येथील पारधीवस्ती येथून विनोद ऊर्फ खंग्या विजय चव्हाण (रा. अशोकनगर, ता. श्रीरामपुर, जि.अ.नगर) याला दि.२७ डिसेंबरला ताब्यात घेतले. पुढील तपास करीत लोणी पोलिसांच्या ताब्यात दिले.
विनोद ऊर्फ खंग्या विजय चव्हाण (रा. अशोकनगर, ता. श्रीरामपुर, जि. अहमदनगर) याने गुन्हा हा त्याचा साथीदार योगेश सिताराम पाटेकर (वय 21 वर्षे, रा. वडाळा महादेव, ता. श्रीरामपुर, जि. अहमदनगर) याच्यासोबत केला असल्याचे सांगितले, परंतु तो साथीदार मिळून आला नाही. त्याबाबत माहिती काढून त्याला ताब्यात घेण्याबाबत शिर्डी डिवायएसपी श्री सातव यांनी ‘टिम’ला तपासाच्या सूचना दिल्या होत्या.
योगेश सिताराम पाटेकर हा पुणतांबा तसेच श्रीरामपूर भागात येणार असल्याबाबत शिर्डी डिवायएसपी टिम’ला माहिती मिळाली. ‘टिम’ने त्याचा शोध घेत असतांना तो पुणतांबा येथे असल्याची माहीती मिळाली, ‘तपास पोलिस टिम’ने त्यास पकडण्यासाठी गेले असता, तो पळून जात असतांना पाठलाग केला, त्याने गोदावरी नदीत उडी मारुन पळून जात असतांना त्याचा पाठलाग करुन मोठ्या शिताफीने पकडण्यात शिर्डी डिवायएसपी टिम’ला यश आले.