संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहिल्यानगर ः शहरातील कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत चैनस्नॅचिंग करणारा आरोपी पकडून त्याच्याकडून मुद्देमाल व दुचाकी जप्त करण्याची कारवाई कोतवाली पोलीसांनी केली आहे. अभिमन्यू विलास कुसळकर (वय 23, रा. बालाजीनगर, सोनई, ता. नेवासा, जि.अहिल्यानगर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, नगर शहर डिवायएसपी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवालीचे पोनि प्रताप दराडे यांनी दिलेल्या सूचनेनुसार सपोनि योगिता कोकाटे, मपोहेकॉ.रोहीणी दरंदले, पोहेकॉ. विक्रम वाघमारे, सुर्यकांत डाके, विशाल दळवी, संदिप पितळे, पोकॉ. दीपक रोहोकले, तानाजी पवार, सुरज कदम, सचिन लोळगे, दत्तात्रय कोतकर, शिरीष तरटे, संकेत धिवर, राम हंडाळ व मोबाईल सेलचे पोकॉ. राहुल गुंडु, पोकॉ नितीन शिंदे आदींच्या टीमने ही कारवाई केली.
याबाबत समजलेली माहीती अशी की, दि.28 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास नगर शहर डिवायएसपी अमोल भारती यांना कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत दोन दिवसापूर्वी महाशिवरात्रीचे दिवशी व त्यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात झालेल्या चैन स्नॅचिंगचे गुन्ह्यातील आरोपी हे त्याच्याकडील होंडा शाईन दुचाकी (एमएच.17.सीयु. 4008) ही वरुन स्टेशनरोड, अहिल्यानगर परिसरात काहीतरी गुन्हा करण्याचे उद्देशाने फिरत असल्याबाबत माहीती मिळाल्यावरुन त्यांनी पोनि.प्रताप दराडे यांना दोन्ही आरोपींचा शोध घेणेबाबत आदेशीत केले. पोनि. प्रताप दराडे यांच्या आदेशाने गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांनी आरोपी यांचा शोध घेत असताना आरोपी अभिमन्यू विलास कुसळकर हा होंडा शाईन दुचाकी मिळून आला. त्याने चौकशीत कोतवाली पोलीस ठाणे गु.र.नं. 149/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 304(2), 3(5) प्रमाणे दि. 27 फेब्रुवारी 2025,, गु.र.नं. 71/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 309 (4), 3(5) प्रमाणे दि. 7 फेब्रुवारी 2025 रोजी दाखल गुन्ह्यांची कबुली दिली. आरोपीने गुन्ह्यात वापरलेली 50 हजार रु किं.ची होंडा शाईन दुचाकी (एमएच.17.सी.यु. 4008) ही हजर केलेवरुन ती जप्त केली. त्यास दि. 28 फेब्रुवारी 2025 रोजी 11.56 वा. अटक केल्यानंतर अटक मुदतीत त्याने दोन्ही गुन्ह्यातील चोरी केलेला 1 लाख 74 हजार रु किं. चा सोन्याचे मुद्देमालासह (सोन्याची लगड) ही त्यांची पत्नी हीने पंचासमक्ष हजर केल्याने ती जप्त केली आहे. गुन्ह्यात सोन्याचे मुद्देमालासह दुचाकी असा एकूण 2 लाख 24 हजार रु.किं.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक मुदतीत आरोपीने कोतवाली पोलीस ठाणे गुरनं. 597/2024 भादंवि 394,34 दाखल 20 मे 2024 रोजी दाखल गुन्ह्याची कबुली दिली. गुन्हे हे त्याने त्याचा साथीदार अजय रुस्तम शिंदे ( रा. कोठला, अहिल्यानगर) याच्यासह केल्याची माहिती दिली.