संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी- चिंचपूर पांगुळ येथील वामनभाऊ विद्यालयात कार्यानुभव कार्यशाळा विद्यार्थ्यांसोबत उत्साही वातावरणात पार पडली.
श्री वामनभाऊ विद्यालयात कार्यानुभव या विषयाची दिवाळीसाठी ‘आकाश कंदील बनवा’ या संदर्भात विद्या्र्थ्याची कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये २२५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यशाळा अतिशय उत्साही व आनंददायी वातावरणात पार पडली. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यशाळेची संकल्पना एकलव्य शिक्षण संस्थेचे समन्वयक तुपे सर यांची होती. यासाठी कला शिक्षक श्री सरोदे सर, एम .एम .नि-हाळी विद्यालय पाथर्डी यांनी मार्गदर्शन केले. या उपक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री नरोडे सर तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर वृंद यांचे सहकार्य लाभले.
✍🏻संकलन-पत्रकार सोमराज बडे
मोबा.९३७२२९५७५७