सोमराज बडे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी : तालुक्यातील चिंचपुर पांगुळ येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामस्थाच्या वतीने भाजपाचे दिवंगत नेते स्व. गोपीनाथ मुंडे यांची शनिवार (दि.३ जून) रोजी ९ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

भाजपाचे दिवंगत नेते स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेस काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष पोपट बडे, युवानेते तथा अहमदनगर भाजपा उपाध्यक्ष धनंजय बडे पा. यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन केले.
यावेळी तुकाराम बडे, सोनाजी बडे, विक्रम साखरे, दगडू बडे, प्रकाश बडे, आश्रुबा बडे, सोमनाथ बडे, काशिनाथ बडे, नितीन साळवे, नवनाथ खंडागळे, संजय बारगजे, गोरख अंबिलढगे, गहिनाथ बडे, बाळासाहेब आव्हाड, भानुदास बडे, बाळू बडे, साईनाथ बडे, संपत अंबिलढगे, संभाजी रंधवे आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
