👉श्रीक्षेत्र पैठण जि. छ.संभाजीनगर व श्री क्षेत्र नागतळा (जि. बीड) येथून पायी व गाडीने कावडधाऱ्यांनी जलभिषेकासाठी आणले पाणी

👉श्रीक्षेत्र पैठण जि. छ.संभाजीनगर व श्री क्षेत्र नागतळा (जि. बीड) येथून पायी व गाडीने कावडधाऱ्यांनी जलभिषेकासाठी आणले पाणी
सोमराज बडे,
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी – अहमदनगर जिल्ह्यातील चिंचपूर पांगुळ (ता.पाथर्डी )येथील ग्रामदैवत असलेले मलिक (मलकेश्वर) महाराजांच्या यात्रोत्सवास आजपासून सुरवात झाली आहे. श्रीक्षेत्र पैठण जि. छत्रपती संभाजी नगर व श्री क्षेत्र नागतळा जि. बीड येथून पायी तसेच गाडीने कावडधाऱ्यांनी आणलेल्या पाण्याने गुरुवारी (दि.२३)गुरुवार रोजी सायंकाळी मलिक देवास जलाभिषेक घालण्यात येणार असून, शुक्रवारी रात्री भव्य छबिना मिरवणूक काढली जाणार आहे. त्याचप्रमाणे रात्री ९ते ११ या कालावधीत राष्ट्रीय किर्तनकार सुनीताताई अभिमन्यु आंधळे महाराज यांचे जाहीर कीर्तन होणार आहे.

शनिवार रोजी सकाळी लोककलावंतांच्या हजेऱ्यांचा कार्यक्रम होईल. दुपारी कुस्त्यांचा जगीं हगामा भरवण्यात येणार आहे.नगर , बीड , उस्मानाबाद,पुणे जिल्ह्यातील नामवंत मल्ल हगाम्यांत हजेरी लावणार आहेत.यात्रा कमिटीच्या वतीने विजयी मल्लांना भरघोस इनामाने गौरविण्यात येणार आहे. चिंचपूर पांगुळ येथे दरवर्षी चैत्र महिन्यात गुडीपाडव्या नंतर येणाऱ्या पहिल्या गुरुवार ते शनिवार या दरम्यान यात्रा भरते. कावड यात्रेमध्ये ग्रा.प.सदस्य विष्णू खाडे, ग्राप.सदस्य आनंद रधवे, रावसाहेब बडे,बाबा राजगुरू, प्रभाकर बडे, रामदास बडे, सुधाकर बडे, संपत अबिलढगे, बंडू बडे,मोहन अबिलढगे, रावसाहेब बडे, महादेव रंधवे, चंद्रकांत बडे, शाईनाथ बडे, पोपट बडे, सहदेव बडे,बाबासाहेब खाडे, तुकाराम बडे, बाबासाहेब बडे, शिवनाथ बडे आदींसह युवक व ग्रामस्थ सहभागी झाले आहेत.
