चिंचपूर पांगुळ येथे मा.आ.स्व.माधवराव निऱ्हाळी यांची जयंती साजरी

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी-
मा.आ.स्व.माधवराव निऱ्हाळी यांच्या जयंती निमित्त श्रीवामनभाऊ विद्यालयात गणित-विज्ञान प्रदर्शन, वक्तृत्व ,सामान्यज्ञान सह विविध प्रकारच्या स्पर्धा उत्साही वातावरणात पार पडली. थोर सामाजिक कार्यकर्ते तथा पाथर्डी तालुक्याचे प्रथम आमदार,स्वातंत्र्य सैनिक स्व.माधवराव निऱ्हाळी यांची जयंती तालुक्यात गुरुवारी (दि.२२डिसें.) ठिकठिकाणी साजरी करण्यात आली.

स्व.माधवराव निऱ्हाळी यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी स्थापन केलेल्या एकलव्य शिक्षण संस्थेच्या विद्यालय चिंचपूर पांगुळ येथील श्री.वामनभाऊ विद्यालयात विद्यार्थ्यांची विज्ञान व गणित या विषयाची कार्यशाळा,तसेच वक्तृत्व स्पर्धा,प्रश्न मंजूषा, सामान्यज्ञान इत्यादी विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. विज्ञान-गणित प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे वैज्ञानिक प्रयोगाचे मॉडेल तयार केले होते.त्याचे आज प्रदर्शन मांडले होते.या प्रदर्शनाचे उदघाटन पाथर्डी शहराचे मा.सरपंच गजानन दामोदर कोष्टी यांच्या हस्ते फित कापून व कै. माधवराव निऱ्हाळी यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून करण्यात आले.
यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. ओंकार सातपुते याने प्रथम क्रमांक,सुवर्णा खाडे द्वितीय तर सुहास बडे,सुरज बडे संयुक्तपणे तृतीय क्रमांक पटकावला.
संदीप ढाकणे, समृद्धी गीते,धनंजय राजगुरू, कावेरी गर्जे ,अथर्व बडे, आदित्य केदार, विश्वजित आव्हाड, ऋषभ अंबिलढगे या विद्यार्थ्यांनी अन्य स्पर्धेत बाजी मारत मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे प्राप्त केली.
यावेळी गजानन कोष्टी म्हणाले की, अतिशय दुर्गम आणि डोंगराळ भागातील असूनही या विद्यार्थ्यांनी मोठ्या कल्पकतेन, प्रतिकूल परिस्थितीतही अतिशय सुंदरपणे हे प्रयोग करून दाखवले आहेत. त्याबद्दल खरोखर कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
गणित-विज्ञान प्रदर्शन‌ उत्साहात पार पडले. यास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाचे शिक्षक श्रीसनी मर्दाने, तुपेसर, विनोद ढाकणे, गर्जे मॅडम, डॉ.संजय उदमले, घुलेेसर यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री नरोडेसर यांनी बोलतांना कै.माधवराव निऱ्हाळी यांच्याबद्दल अनेक आठवणी याप्रसंगी सांगितल्या. यावेळी शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष पेंटर गणेश बडे, बाबासाहेब राजगुरू, सोमनाथ विठ्ठल बडे, मंगल वायभासे, रंभाबाई रंधवे, भागवत अंबिलढगे, कमल राजगुरू यांच्यासह अन्य नागरिक,शिक्षक,विदयार्थी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर वृंद यांचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब दहिफळे यांनी केले.प्रास्ताविक संजय उदमले यांनी केले. आभार सोमनाथ जाधव यांनी मानले.
✍🏻संकलन-पत्रकार सोमराज बडे मोबा.९३७२२९५७५७

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!