संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी- तालुक्यातील चिंचपूर पांगुळ येथील ग्रामदैवत मलिक महाराजांच्या यात्रोत्सवाची सांगता कुस्त्याचा हगामाच्या कार्यक्रमाने उत्साहात झाली.यात्रा महोत्सवसाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
दरम्यान श्रीक्षेत्र पैठण व नागतळा येथून पायी कावडधाऱ्यांनी आणलेल्या पाण्याने गुरुवारी सायंकाळी मलिक देवास जलाभिषेक घालण्यात आला. शुक्रवारी रात्री भव्य छबिना मिरवणूक निघाली तसेच (आर्केष्ट्रा)गाण्याचा कार्यक्रम त्याच रात्री झाला.
तिसऱ्या दिवशी सकाळी लोककलावंतांच्या हजेऱ्यांचा कार्यक्रम झाला . दुपारी कुस्त्यांचा जगीं हगामा भरवण्यात आला नगर , बीड , उस्मानाबाद,पुणे जिल्ह्यातील नामवंत मल्लानी हगाम्यांत हजेरी लावली यात्रा कमिटीच्या वतीने विजयी मल्लांना भरघोस इनामाने गौरविण्यात आले . चिंचपूर पांगुळ येथे दरवर्षी चैत्र महिन्यात गुडीपाडव्या नंतर येणाऱ्या पहिल्या गुरुवार ते शनिवार या दरम्यान यात्रा भरते परंतु , गेली दोन वर्षे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यात्रोत्सव बंद होता.
यावेळी मा.जि.प.स.गहिनीनाथ शिरसाठ यांची विशेष उपस्थिती होती. शहादेव खाडे, बाबू गीते, आजीनाथ बडे, दिलीप बडे,उद्धव केदार, मोरेश्वर बडे, अशोक केदार,भूजंग बडे, आजीनाथ बडे, बाळासाहेब बडे आदी यावेळी उपस्थित होते.
✒️संकलन-पत्रकार सोमराज बडे