चिंचपूर पांगुळ येथील शिबीरात १०० पाळीव प्राण्यांना लसीकरण

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी – 
तालुक्यातील चिंचपूर पांगुळ मानेवाडी, जोगेवाडी, वडगांव येथे पशुवैद्यकीय दवाखाना चिंचपूर ईजदे या अंतर्गत भव्य पशुलसिकरणाचे शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. पावसाळा सुरू झालेला असून पावसाळ्यापूर्वी बैल, गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या, घोडा इत्यादी जनावरांचे लसीकरण महत्वाचे आहे. शेतकऱ्यांमध्ये याची जनजागृती व्हावी, यादृष्टीने या शिबीराचे आयोजन करण्यात आले  होते.
या शिबीरासाठी डॉ.सोनवणे, डॉ.सोमनाथ खेडकर, श्रीनिवास खेडकर यांनी परिश्रम घेतले.
लसिकरणासाठी लाळ्या घटसर्प व फऱ्या या रोगांची लस जनावरांना देण्यात आली. एकूण १०० जनावरांना लसी देण्यात आल्या. यासाठी प्रती जनावर पाच रुपये फी शेतकऱ्याकडून घेण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी आपल्या सर्व जनावराना लशीकरण करून घ्यावे जेणेकरून साथ रोगापासून त्यांचा बचाव होईल, असे आवाहन डॉ.सोनवणे, डॉ खेडकर यांनी केले आहे. याप्रसंगी नवनाथ सोपान बडे, भानुदास बडे, चंद्रकांत बडे आदी उपस्थित होते.

✒️संकलन-पत्रकार सोमराज बडे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!