सोमराज बडे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी : – अहमदनगर जिल्ह्यातील चिंचपूर पांगुळ- मानेवाडी ता.पाथर्डी येथे गुरुवर्य श्री संत वामनभाऊ महाराजांच्या जन्मोत्सवा निमित्ताने दि.२७ मार्च ते दि.३ एप्रिल या कालावधीत आयोजित अखंड हरिनाम सप्ताह सुरु होता. दररोज सकाळी काकडा,भजन,गाथा-भजन,रामकथा,दररोज रात्री कीर्तन ,जागर असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सोमवारी (ता.३)रोजी गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज यांचे काल्याचे कीर्तन झाले. त्यानंतर दुपारी १ वाजता श्री संत वामनभाऊ यांच्या चरण पादुकावर पुस्पवृष्टी करत सांगता करण्यात आली.
सप्ताहाच्या कार्यक्रमात अनेक साधू संत ,राजकीय नेते यांनी भेट दिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय धर्मजागरण प्रमुख यांची या कार्यक्रमासाठी विशेष उपस्तिती होती.अखिल भारतीय धर्मजागरण प्रमुख शरदरावजी ढोले, पाथर्डी तालुका संघचालक अरविंदजी पागावकर,राजूजी पुल्लया,महादेव कोकाटे,सोमनाथजी झाडे,शेवंगाव-पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे,राष्ट्रवादीचे नेते प्रताप ढाकणे,शिवशंकर राजळे,गहिनीनाथ शिरसाठ,अनेक मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान या सप्तहाची सांगता प्रसंगी भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.सुमारे सत्तर ते ऐंशी हजार भाविक यावेळी उपस्थित होते.अन्नदान ,पाणी,पार्किंग व्यवस्था,आरोग्य सेवा आदींची व्यवस्था तरुणांनी व ग्रामस्थांनी चोख ठेवली होती. याचे तोंड भरून कौतुक महंत विठ्ठल महाराज व आलेल्या भाविकांनी केले.
चिंचपूर पांगुळ-मानेवाडी ग्रामस्थांच्या वतीने भाविक भक्तांचे स्वागत करण्यात आले.