सोमराज बडे,
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork (व्हिडिओ)
पाथर्डी – अहमदनगर जिल्ह्यातील चिंचपूर पांगुळ- मानेवाडी येथे गुरुवर्य श्री संत वामनभाऊ महाराजांच्या जन्मोत्सवा निमित्ताने दि.२७ मार्च ते दि.३ एप्रिल या कालावधीत आयोजित अखंड हरिनाम सप्ताह होत आहे. उद्या (सोमवारी) सकाळी १२ वाजता श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावरून वैराग्यमूर्ती श्री. संत वामनभाऊ महाराज यांच्या पादुका गडावरून उद्योजक राजेंद्र विष्णू खाडे, पोपट हरी बडे, सचिन नामदेव बडे यांचे वतीने हेलिकॉफ्टरने आणल्या जाणार आहेत.
त्यानंतर गावातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर हेलिकॉपटरने मंडपावर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. त्यानंतर अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात होणार आहे. ८ दिवस काकडा, रामकथा, हरिपाठ प्रवचन, कीर्तन, जागर आदी कर्यक्रम होणार आहेत.
चिंचपूर पांगुळ-मानेवाडी येथील श्री संत वामनभाऊ महाराजांच्या अखंड हरिनाम सप्ताह कमिटीच्या वतीने भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा युवानेते धनंजय बडे पा, आदर्श शेतकरी पोपटराव बडे पा. व ग्रामस्थांनी पंचक्रोशीतील भाविकांना सप्ताहास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.