सोमराज बडे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी – अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर पांगुळ- मानेवाडी येथील श्री वामनभाऊ महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे निमंत्रण महसुल मंत्री तथा नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व दक्षिण नगरचे खासदार सुजय विखे पाटील यांना शनीवारी (दि.१८) चिंचपूर पांगुळ येथील श्री वामनभाऊ महाराजांच्या अखंड हरिनाम सप्ताह कमिटीच्या वतीने नगर येथे भेटून देण्यात आले. यावेळी निमंत्रण देताना भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा युवानेते धनंजय बडे,मानेवाडी सेवा.सोसायटीचे चेअरमन अशोक बडे, मा. उपसरपंच शिवाजी बडे, अशोक बारगजे, मा.उपसरपंच आजीनाथ बडे, संपत दरेकर,धोंडिबा धायतडक, सोमनाथ बडे,दत्तू नागरगोजे, सोनाजी बडे, प्रकाश बडे,केशव बडे,विशाल धायतडक,आदिंसह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.