संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
मुंबई – अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर पांगुळ- मानेवाडी येथील श्री वामनभाऊ महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे निमंत्रण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजीमंत्री धनंजय मुंडे व भाजपाच्या सरचिटणीस तथा नेत्या पंकजा मुंडे यांना मंगळवारी (दि.१४) चिंचपूर पांगुळ श्री वामनभाऊ महाराजांच्या अखंड हरिनाम सप्ताह कमिटीच्या वतीने मुंबई येथे भेटून देण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ नेते तथा आदर्श शेतकरी पोपटराव बडे पा., युवानेते तथा उद्योजक सचिन बडे पा., राजु खाडे, सेवानिवृत्त पीआय जगन्नाथ बडे, आर.के.बडे, नामदेव साहेब, दीपक बडे, मुंबई पोलीस बाळासाहेब बडे, अशोक केदार, मोरेश्वर बडे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.