सोमराज बडे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी : तालुक्यातील चिंचपूर पांगुळ बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करत बचतगटांना कर्जाच्या चेकचे बुधवारी (दि.८) वितरण करण्यात आले.
ग्रामीण भागातील शेतकरी महिलांची आर्थिक परिस्थिती बदलली पाहिजे. त्या स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे. स्वावलंबी होण्यास मदत व्हावी, म्हणून बँक ऑफ महाराष्ट्राच्या वतीने नेहमीच सहकार्य केले जाते. याचाच भाग म्हणून चिंचपूर पांगुळ शाखेच्या वतीने महिल दिनाचे औचित्य साधून महिलांना मदत व्हावी म्हणून कर्ज वाटप करण्यात आले आहे,अशी माहिती शाखाधिकारी प्रशांत साळवे यांनी यावेळी दिली. यावेळी वडगावचे सरपंच तथा ज्येष्ठ नेते आदिनाथ बडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते कर्जाचे चेकचे वितरण बचतगटांच्या महिलांना करण्यात आले. या दरम्यान कृष्णा गरड, भूषण ढेंबरे, बाबासाहेब उदमले, व मनोज वनारसे, आसाराम शेळके यांच्यासह बचत गटांच्या महिला उपस्थित होत्या.